पाटणा | भारताच्या शेजारील असलेल्या नेपाळचे विमान हे भारतीय हवाई हद्दीत घुसल्याची माहिती समोर आली आहे. सदरील विमान हे भारतातील नेपाळ सीमेला लागून असलेल्या बिहारच्या महाराजगंज जिल्ह्यातील सोनौली शहरावर हे विमान खूप वेळ फेऱ्या मारताना दिसत होते, अशी माहिती आता समोर आली आहे. नेपाळच्या गौतम बुद्ध विमानतळावर लँन्डींग दरम्यान हे विमान 400 मीटर आत घुसले होते.
सदरील घटना ही शुक्रवारी 1 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. भैरवहा स्थानकाचे अधीक्षक दर्शन ढिमरे यांनी सांगितलेल्या माहितीनुसार खराब हवामान आणि लँन्डींग सिग्नल न मिळाल्यानं अशा प्रकारच्या समस्या निर्माण होतात. जर उत्तरेकडील भागात हवामान खराब असेल तर विमान उतरवण्यासाठी दक्षिण भागात यावे लागते, त्यामुळे विमानास फिरण्यासाठी भारतीय हवाई सीमेत जावं लागतं.
या घटनेसंदर्भात बोलताना नेपाळ एअरपोर्ट अथॉरिटीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे, की भैरवहा विमानतळावर सुरक्षित लँन्डींग करण्यासाठी जवळपास 4 किमीच्या सुरक्षित जागेची आवश्यकता असते.
दरम्यान, नेपाळच्या दक्षिण दिशेला जवळपास 3 किमी अंतरावरच भारतीय सीमा चालू होते. म्हणून विमानाला भारतीय हवाई हद्दीत प्रवेश करावा लागतो. अशा आपत्कालीन परिस्थितीत वैमानिक गोरखपूर, वाराणसी विमानतळाची परवानगी घेत वापर करतात.
थोडक्यात बातम्या –
प्रभू रामचंद्राच्या दर्शनासाठी राज ठाकरे अयोध्येला जाणार, कांचन गिरीजींनी घेतली भेट
आमच्या धर्माचा अपमान होत आहे म्हणत तरूणीला जबरदस्तीने काढायला लावला बुरखा… पाहा व्हिडीओ
“चोरांना आणि त्यांच्या सरदारांना हिशोब द्यावाच लागेल”
…अन् क्षणात भलं मोठं घर कोसळलं, पाहा केरळमधील थरारक व्हिडीओ
भाजपला मोठा धक्का; ‘या’ दोन मोठ्या नेत्यांचा पक्षाला रामराम
“पवारांचा एकेरी उल्लेख करणं पाटलांना शोभतं का? कुठे हिमालय, कुठे टेकाड टेंगूळ”
Comments are closed.