बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुसळधार पावसामुळं लिफ्टमध्ये घुसलं पाणी अन्…, पाहा व्हायरल व्हिडीओ

नवी दिल्ली | पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलेलं पाहायला मिळत आहे. पूरग्रस्तस्थिती आणि कोसळलेल्या दरडीमुळे सध्या चिंतेचे वातावरण निर्माण झालं आहे. या मुसळधार पावसामुळे झालेल्या भीषण परिस्थितीचे अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले पाहायला मिळत आहेत. यातच पावसाचं रौद्र रुप दाखवणारा आणखी एक व्हिडीओ समोर येत आहे.

देशासह विदेशातही पावसाचं रौद्र रुप पाहायला मिळत आहे. सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमधून अमेरिकेत पावसामुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीचं चित्र पाहायला मिळत आहे. व्हायरल होणारा हा व्हिडीओ अमेरिकेतील ओमाहा नेब्रेसका भागातील आहे. व्हिडीओमधून पाहायला मिळतंय की, जोरदार पावसामुळे साचलेलं पाणी थेट लिफ्टमध्ये घुसलं आहे.

अचानकपणे वाढलेल्या पाण्याच्या पातळीमुळे पाणी लिफ्टमध्ये शिरलं. त्यामुळे लिफ्टमध्ये असणारे तरुण-तरुणी तेथेच अडकून गेले. घराबाहेर सर्वत्र पाणी साचलेलं असतानाही हे तरुण-तरुणी खाली येण्याचा प्रयत्न करत होते. लिफ्ट खाली उतरत असताना पाणी लिफ्टमध्ये शिरुन त्यांच्या तोंडापर्यंत पोहोचलं. हा सर्व धक्कादायक प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

दरम्यान, त्या तरुणांनी मित्रांना फोन करत मदत मागितली. मित्रांनी पोलिसांच्या मदतीनं अडकलेल्यांना वाचवलं. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर सगळ्याचं लक्ष वेधून घेत असून या व्हिडीओवर अनेक प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.

थोडक्यात बातम्या –

‘कोल्हापूरचं नाव कलापूर करावं’; अभिनेता सचिन पिळगावकरांची मागणी

हिमाचल प्रदेशमध्ये दरड कोसळून 13 जणांचा मृत्यू; मोदींकडून ‘इतक्या’ लाखांची मदत जाहीर

आम्हाला अडवण्यासाठी महिला कमांडो आणताय ही तुमची कसली मर्दानगी- संजय राऊत

धक्कादायक! कोरोना लसीऐवजी नर्सनं दिलं मिठाचं पाणी

मोठी बातमी ! राज्य सरकारचा यु-टर्न; शाळा सुरू करण्याचा निर्णय अखेर रद्द

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More