माजलगावच्या वादग्रस्त DYSP भाग्यश्री नवटकेंवर अखेर कारवाई

बीड | दलितविरोधी वक्तव्य केल्याची व्हीडिओ क्लीप व्हायरल झाल्यानंतर माजलगावच्या DYSP भाग्यश्री नवटकेंवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांची औरंगाबादला बदली करण्यात आली आहे. 

अॅट्रॉसिटी आणि दलितांविरोधात वक्तव्य करताना नवटके या व्हायरल व्हीडिओमध्ये दिसत आहेत. त्यानंतर दलित समाजात संतापाची लाट पसरली होती. 

नवटके यांच्याविरुद्ध सोमवारपर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नाही तर आपण कोर्टात जाऊ, असा इशारा बहुजन विकास मोर्चाचे अध्यक्ष बाबुराव पोटभरे यांनी दिला आहे. भाग्यश्री नवटके यांच्यावर अॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करुन त्यांना पोलीस सेवेतून बडतर्फ करावे, अशी मागणी बाबूराव पोटभरे यांनी केली आहे.

दरम्यान, बीडचे पोलीस अधीक्षक श्रीधर गोविंदराजन यांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-खासदार सुप्रिया सुळे यांना ‘श्रेष्ठ सांसद’ पुरस्कार जाहीर

-समोरच्या उमेदवाराला पराभूत करण्यासाठी चक्क घुबडांचा वापर!

-चक्क पंतप्रधान आवास योजनेंतर्गत बांधलेलं घरच गेलं चोरीला!

-शरद पवार आणि नारायण राणेंच्या भेटीवर चंद्रकांत पाटील म्हणतात…

-तुमच्यासाठी कायपण!!! उद्धव ठाकरेंसाठी मुख्यमंत्र्यांनी मोडला प्रोटोकॉल