बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

एका दिवसात 1002 कोटींची कमाई, आशियाचे दुसरे सर्वात श्रीमंत कसे बनले गौतम अदानी?

मुंबई | कोरोना महामारीमुळे जगभरातल्या अनेक अर्थव्यवस्था कोलमडून पडल्या. त्यामुळे अनेक उद्योग व्यवसाय डबघाईला गेलेत. त्याचा परिणाम सर्वसामान्यांवर झालाच परंतु जगभरातील आणि भारतातील उद्योजकांना देखील हा त्रास सहन करावा लागला. मात्र या कठिण परिस्थितीही देशातील अनेक उद्योगसंस्थांनी नव्याने सुरूवात केली आणि आपला व्यवसाय वाढवण्याचा प्रयत्न केला. अलिकडेच जगभरातील श्रीमंत व्यक्तीची आयआयएफएल वेल्थ हुरून इंडिया रिच लिस्ट 2021 जाहीर झाली. यामध्ये  अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या यादीमध्ये दुसऱ्या स्थानावर झेप घेतली. गौतम अदानी यांनी चीनमधील उद्योजक झोंग शानशान यांना मागे टाकले आहे.

भारतीय उद्योजक गौतम अदानी आणि त्यांच्यां कुटुंबीयांनी मागील एक वर्षात दररोज हजारो कोटींची कमाई केली आहे. यामळे अदानी यांची 2020 मध्ये एकुण संपत्ती 1,40,200  इतकी रूपये होती. जी 2021 मध्ये 5,05,900 कोटी झाली आहे. या वर्षात मोठ्या प्रमाणात संपत्ती वाढल्यामुळे गौतम अदानी देशातील दुसरे श्रींमत व्यक्ती बनले आहेत. आयआयएफएल वेल्थ हुरून इंडिया यांच्या माहितीनुसार  59 वर्षीय अदानी यांनी चीनचे झोंग शानशान यांना मागे टाकले आहे.

अदानी समूह वीज, खनिकर्म, वायू, बंदर, विमानतळ अशा विविध क्षेत्रात कार्यरत आहे. या समूहाचे सर्वच लिस्टेट कंपन्यांचे बाजारमुल्य चालू वर्षात थेट 50 टक्क्यांवर गेले आहेत. त्यामुळे 2020 मध्ये अदानी समूहाची मालमत्ता तब्बल 532 टक्के वाढ झालेली आहे. यामधून सर्वाधिक 18 अब्ज डॉलर मालमत्ता अदानी ग्रीन एनर्जी कंपनीची आहे. तर अदानी टोटल गॅसचे मुल्य सर्वाधिक  97 टक्क्यांनी वाढले आहे.

चीनचे उद्योजक झोंग शानशान हे ‘वॉटर किंग’ म्हणून ओळखले जातात. मागील वर्षी मुकेश अंबानी यांना मागे टाकत झोंग शानशान आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले होते. त्यावेळी त्यांची एकुण एकुण संपत्ती 70.9 अब्ज डॉलरवरून 77.8 अब्ज डॉलर झाली होती. त्यावेळी चीनमधील सर्वात श्रीमंत व्यक्ती अलीबाबाचे संस्थापक जॅक मा यांनाही झोंग शानशान यांनी मागे टाकले होते.

झोंग शानशान यांच्याबद्दल सोशल मीडियावर कमी चर्चा केल्या जात असतात. मागील काही वर्षात पत्रकारीता, मशरूमची शेती आणि आरोग्य क्षेत्राबद्दल सेवामुळे त्यांच्या संपत्तीत वाढ झालेली बघायला मिळाली होती. झोंग शानशान यांनी चीनच्या तंत्रंज्ञानाच्या एका समुहाशी हातमिळवणी केल्यानंतर त्यांच्या संपत्तीत भरघोस वाढ झालेली दिसून आली होती.

आयआयएफएल वेल्थ हुरून इंडिया रिच लिस्ट 2021 नुसार गौतम अदानी यांचा भाऊ विनोद शांतीलाल अदानी हे देखील श्रीमंताच्या पहिल्या 10 यादीत आहेत. विनोद शांतीलाल अदानी यांनी 12 व्या स्थानावरून आठव्या स्थानी झेप घेतली आहे. विनोद शांतीलाल अदानी यांची दहाच्या आत यादीत येण्याची पहिलीच वेळ आहे.  त्यांच्या कुटुंबाची संपत्ती 21 टक्क्यांनी वाढली आहे. जी आता 1,31,600 कोटींवर पोहोचली आहे.

भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांनी गेल्या मागील वर्षात दररोज 169 कोटी रूपये कमावले आहेत. मुकेश अंबानी आणि रिलायन्स इंडस्ट्रीजची संपत्ती एका वर्षात 9 टक्क्यांनी वाढून 7,18,200 इतकी कोटी झाली आहे.  आयआयएफएल वेल्थ हारून इंडिया रिपोर्टमधून ही माहिती मिळाली आहे. एचसीएलचे शिव नादर आणि त्यांच्या कुटुंबाची संपत्ती गेल्या एक वर्षात 67 टक्क्यांनी वाढून 3,66,000 कोटी रूपये पर्यंत पोहोचली आहे.

लंडनमधील व्यापारी लक्ष्मी नारायण मित्तल आणि त्यांच्या कुटुंबाच्या संपत्तीत गेल्या एका वर्षात 187 टक्क्यांची वाढ झाली आहे. आर्सेलर मित्तलचे मालक लक्ष्मी नारायण मित्तल यांची संपत्ती आता 71,74,400 कोटी इतकी झाली आहे. गेल्या एक वर्षात मित्तल यांनी दररोज 312 कोटी रूपये कमावले आहेत. एचसीएलचे शिव नादर यांनी गेल्या  एक वर्षात दररोज 260 कोटी रूपयांची कमाई केली आहे. पुण्याच्या सायरस पूनावाला आणि त्यांच्या कुटुंबाने गेल्या वर्षात 190 कोटींची कमाई केली आहे.  आणि सायरस पूनावाला यांची संपत्ती  74 टक्क्यांनी वाढून 61,63,700 कोटी झाली आहे.

थोडक्यात बातम्या- 

‘या नेत्यासोबतची मैत्री आणि विश्वासच लोकशाहीचा सर्वात मोठा विजय’; काॅंग्रेसच्या मुख्यमंत्र्यांचं मोदींकडून कौतुक!

“परमबीर सिंह यांना वाचवणं भाजपसाठी गरजेचं आहे”

“रस्ते बांधणं म्हणजे ‘रॉकेट सायन्स’ नाही, ठाकरे सरकार सत्तेत आहे तोपर्यंत…”

”नाना पटोले काहीही बोलतात, नाना असे व्यक्ती आहेत जे…”

“मी शेतकऱ्यांच्या बांधावर होतो, त्यावेळी पंकजा मुंडे अमेरिकेत…”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More