बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

च्युइंगम खाल्ल्याने कोरोना रोखता येतो?, शास्त्रज्ञांनी केला ‘हा’ दावा

मुंबई | जगात कोरोना (Coronavirus) साथीने हाहाकार माजवला आहे. शास्त्रज्ञ कोरोनावर औषध शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. कोरोनावर औषध शोधण्याचं संशोधन सुरू असतानाचं एक दावा करण्यात आला आहे. च्युइंगम (Chewing Gum) खाल्यास कोरोनाला रोखण्यासाठी मदत होते, असा दावा करण्यात आला आहे. अमेरिकेच्या (America) शास्त्रज्ञांनी याबाबत काही प्रयोग केले आहेत.

अमेरिकेतील पेनिसिल्वहानिया युनिव्हर्सिटीमधील (University of Pennsylvania) यासंदर्भात दावा केला आहे. च्युइंगमच्या सेवनाने कोरोना टाळता येतो किंवा कोरोना रोखता येता असा दावा केला आहे. च्युइंगम खात असताना 95 विषाणू हे तोंडातच अडकले जातात. या कारणास्तव कोरोना संसर्ग होऊ शकत नाही, असं सांगण्यात येत आहे.

वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार कोरोना लाळेतून किंवा शिंकेतून प्रसारीत होतो. लाळेच्या विरोधात च्युइंगम एखाद्या जाळीचं काम करतो. त्यामधून कोरोना प्रसार रोखला जाऊ शकतो. च्युइंगममध्ये एससीई-2 प्रोटीन असतं जे पेशीच्या मुळापर्यंत जातं, असंही त्यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, कोरोना विषाणू पेशीमध्ये जातो. एससीई-2 मध्ये मिसळतो. त्यातून तयार होणारा लोड च्युइंगम  रोखू शकतो, असा अजब दावा करण्यात आला आहे. कोरोनावर जगभरात वेगवेगळ्या लसी असताना असा च्युइंगम खाल्यास कोरोना रोखता येतो असा अजब दावा केल्यामुळे यावर सवाल उपस्थित करण्यात येत आहेत.

थोडक्यात बातम्या-

मोठी बातमी! भारतात Omicron ची एन्ट्री, ‘या’ राज्यात आढळले रूग्ण

…अन् अशोक चव्हाणांनी शेअर केला विलासरावांच्या भाषणाचा ‘तो’ जुना व्हिडीओ

“काॅंग्रेसला सल्ला द्यावा ऐवढी नवाब मलिक यांची पात्रता नाही”

“जागा किती तर 56 अन् बाता मात्र मोठ्या”, देवेंद्र फडणवीसांची खोचक टीका

विधानसभा अध्यक्षपद कोणाला मिळणार?; ‘या’ तीन नावाची जोरदार चर्चा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More