बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

टोस्ट आवडीने खात असाल तर हा व्हिडीओ एकदा पाहाच!

नवी दिल्ली | अनेक चहा प्रेमींना चहासोबत टोस्ट, खारी खाणं आवडतं. ते बनतं कसं याची देखील कल्पना असते. मात्र प्रत्यक्षात कोणी तरी क्वचित पाहिलं असेल. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका व्हिडीओमुळे टोस्ट खावं की नाही?, असा प्रश्न उपस्थित केला आहे. हा व्हिडीओ पाहून कोणालाही किळस वाटेल.

हा व्हिडीओ कुठला आहे आणि कधीचा आहे अद्याप समोर आलेलं नाही. हा व्हिडीओ एका बेकरीमधील आहे. यामध्ये कामगार टोस्ट पॅकिंग करत आहेत. यावेळी ते अक्षरशः कोणालाही किळस येईल या पद्धतीने पॅकिंग करत आहे. ट्रे-मध्ये आलेल्या टोस्टवर कामगार मुद्दाम पाय ठेवत आहे. तर एक जण टोस्ट उचलून त्याला चाटून मग पॅक करत आहे.

या व्हिडीओवर अनेकांंनी प्रतिक्रिया दिली आहे. असे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर सतत व्हायरल होत असतात. यामुळे बेकरी पदार्थ खावावे की नाही असा प्रश्न लोकांना पडलाय.

दरम्यान, व्हिडीओवर एकाने कमेंट करत व्हिडीओ हरियाणा नाही तर दिल्लीतला असावा, असा अंदाज लावला आहे. ट्विटरवर प्रिया लाड नावाच्या अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. अनेकांनी हा व्हडीओ पाहिला असून अनेकांनी संताप व्यक्त केलाय.

पाहा व्हडीओः

थोडक्यात बातम्या-

राजकारण हा फार सिरीयस बिझनेस- देवेंद्र फडणवीस

दोन सख्ख्या भावांवर काळाचा घाला; अचानक वायर तुटली अन् होत्याचं नव्हतं झालं, पाहा व्हिडीओ

साताऱ्याचे सुपुत्र सोमनाथ मांढरे यांना लडाखमध्ये वीरमरण, गावावर शोककळा

ही माझी शेवटची राजकीय लढाई- कॅप्टन अमरिंदर सिंग

TMC आता नवीन डाव खेळण्याची शक्यता; पक्षात प्रवेश करताच बाबूल सुप्रियोंना मोठं गिफ्ट?

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More