बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

बँकेच्या 650 कोटीच्या घोटाळ्याप्रकरणी माजी आमदार विवेक पाटील यांना ईडीकडुन अटक

मुंबई | शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार विवेक पाटील यांना मनीलाँड्रींग प्रकरणात सक्तवसुली संचलनालयाकडुन अटक करण्यात आली आहे. कर्नाळा बँकेच्या अध्यक्षपदावर राहुन 650 कोटी रूपयांचा आर्थिक घोटाळा केल्याप्रकरणी चौकशी करण्यात आली आणि ईडीकडुन पनवेलच्या राहत्या घरून त्यांना काल अटक करण्यात आली आहे.

पनवेलचे आमदार प्रशांत ठाकुर आणि उरणचे आमदार महेश बालदी यांनी ठेवीदार संघर्ष समितीसोबत एकत्र येऊन बँकेच्या ठेवीदारांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं आहे. दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासुन बँकेतील ठेवीदारांची आंदोलनं सुरू होती. तसेच या प्रकरणात स्थानिक लोकप्रतिनिधींनी हस्तक्षेप केल्याने याची दखल घेण्यात आली.

संबंधित कर्नाळा बँकेचा घोटाळा उघडकीस आल्यानंतर बँकेच्या व्यवहारांवर मोठ्या प्रमाणात बंधनं आली तसेच ठेवीदारांचे हक्काचे पैसे मिळवण्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागत आहे. या प्रकरणात आता माजी आमदार आणि बँकेचे अध्यक्ष विवेक पाटील यांना अटक झाल्याने त्यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याची चिन्ह दिसुन येत आहे.

या सर्व प्रकरणात एकुण 76 जणांवर आतापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या सर्व घटनेत ठेवीदारांच्या पैशांच्या बाबतीत अद्याप कोणताही निर्णय झाला नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे ठेवीदारांना कर्नाळा बँकेतील त्याचे हक्काचे पैसे कधी मिळणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या – 

महाराष्ट्रात नव्या कोरोनाबाधितांची संख्या वाढली, पण सक्रिय रुग्णसंख्येत घट

आज कोल्हापूरातुन मराठा क्रांती मोर्चाला सुरुवात; वाचा आंदोलनाच्या प्रमुख 11 मागण्या

वर्ल्ड टेस्ट फायनलसाठी भारताच्या 15 शिलेदारांची फौज सज्ज; दोन द्विशतकं करणाऱ्या खेळाडूला वगळलं

‘सुशांतने 10 वाजून 10 मिनिटांनी…..’; एक वर्षभरानंतर समोर आलं सुशांतच्या मृत्यूचं कारण

सोन्या-चांदीचे भाव पुन्हा उतरले, वाचा आजचे ताजे दर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More