मुंबई | पैशांच्या अफरातफरी प्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) आमदार आणि महाविकास आघाडी सरकारमधील माजी मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) हे सध्या अटकेत आहेत. त्यांनी यापूर्वी अनेकदा जामिन अर्ज केले होते. न्यायालयाने दरवेळी त्यांच्या अर्जावर नकार कळविला. नुकत्याच त्यांनी केलेल्या जामिन अर्जावर ईडीने (सक्तवसुली संचनालय) विरोध केला आहे.
आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपाखाली मलिकांना फेब्रुवारी 23 रोजी ईडीकडून अटक करण्यात आली होती. तेव्हापासून ते गजाआड आहेत. तपास यंत्रणांकडे कोणतेही सबळ पुरावे नाहीत, या कारणावर मलिकांनी न्यायालयात जामिन अर्ज केला होता. या याचिकेवरील पुढील सुनावणी 26 जुलै होणार आहे. नवाब मलिकांनी केलेला दावा योग्य नसल्याचे ईडीने (Enforcement Directorate) न्यायालयात सांगितले आहे.
नवाब मलिकांच्या विरोधात ईडीकडे सबळ पुरावे असल्याचे त्यांनी म्हटले असून, तपासासाठी आणखी वेळ ईडीने मागून घेतला आहे. या प्रकरणाचा तपास अजून सुरु असून त्यांना जामिन दिल्यास त्याचा चुकीचा परीणाम तपासावर होऊ शकतो, असे ईडीने आपल्या उत्तरात म्हटले आहे.
मुंबईतील कुर्ला (Kurla) येथील जमिन खरेदी विक्री प्रकरणात आर्थिक गैरव्यवहार, तसेच कुख्यात अंडरवर्ल्ड गुंड दाऊद इब्राहिम कासकरची (Dawood Ibrahim Kaskar) बहिणी हसिना पारकरसोबत (Hasina Parkar) जमिन गैरव्यवहार केल्याचे मलिकांवर आरोप आहेत. मलिकांनी पारकर यांच्याकडून 3 एकर जमिन खरेदी केल्याचा आरोप आहे. तसेच मलिकांनी ह्या व्यवहाराचे पैसे हसिना पारकर यांना दिले आणि त्यांनी दाऊद इब्राहिम कासकरला दिले, त्यामुळे टेरर फंडींगचे आरोप देखील त्यांच्यावर आहेत.
थोडक्यात बातम्या –
फोन टॅपिंग प्रकरणी ईडीची सर्वात मोठी कारवाई!
“उद्धव ठाकरेंच्या आदेशानेच मी अजित पवारांवर पातळी सोडून टीका केली”
‘शिंदे गट नाही गटार’; संजय राऊत बंडखोरांवर पुन्हा बरसले
सोनं खरेदी करण्याची सुवर्णसंधी; सोनं-चांदी झालं स्वस्त, वाचा ताजे दर
ज्यांना जायचं त्यांनी खुशाल जा, उगाच टीव्ही समोर जाऊन नाटकं करू नका- उद्धव ठाकरे
Comments are closed.