बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अखेर 8 लाखांची लाच घेणाऱ्या शिक्षणाधिकारी वैशाली झनकर वीरला अटक!

नाशिक | सध्या आठ लाख रुपयांच्या लाच खोरीप्रकरणी चर्चेत असलेलं नाव म्हणजे शिक्षणाधिकारी वैशाली झनकर वीर. नाशिक जिल्हा परिषदेच्या लाचखोर शिक्षणाधिकारी वैशाली झनकर वीर एसीबीच्या हातावर तुरी देऊन फरार झाल्या होत्या. एसीबीकडून त्यांचा शोध सुरु होता. आता अखेर त्या पोलिसांच्या जाळ्यात सापडल्या असून त्यांना अटक करण्यात आली आहे.

8 लाख रुपयांची लाच स्वीकारल्या प्रकरणी शिक्षणाधिकारी वैशाली झनकर वीरला अटक करण्यात आली आहे. वैशाली झनकर वीरला 8 लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडलं. त्यांनी कोट्यावधींची लाचखोरी केली असल्यांचं उघड झाल्यावर पोलिसांनी सापळा तयार करत त्यांना रंगेहाथ पकडलं होतं. मात्र यानंतर त्या फरार झाल्या होत्या.

गेल्या दोन-तीन दिवसांपासून वैशाली झनकर वीर यांना पकडण्यासाठी शोध मोहिम सुरु होती. आज अखेर त्यांना पकडत अटक करण्यात आली आहे. अटकेनंतर वैशाली यांना आज न्यायालयात हजर केलं जाणार आहे. 

दरम्यान, वैशाली झनकर वीरला अटक केल्यानंतर आता त्यांच्या अडचणींत वाढ होणार आहे. वैशाली यांनी आजच वकिलामार्फत अटकपूर्व जामिनासाठी अर्जही केला होता. आता याप्रकरणात आणकी काय माहिती समोर येतेय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या –

पुण्यातील मराठे ज्वेलर्सच्या प्रणव मराठे यांना अटक; धक्कादायक कारण आलं समोर

लसींच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे आज मुंबईत लसीकरण बंद!

‘आमदाराच्या मुलीला थार गाडी द्या’; सनी देओलचं थेट आनंद महिंद्रांना पत्र

भागवत कराडांपेक्षा माझी उंची खूप मोठी, त्यांची माझ्याशी तुलनाच होऊ शकत नाही- चंद्रकांत खैरे

कोरोनाची ‘ही’ लस ठरतेय धोकादायक; अभ्यासातून धक्कादायक माहिती समोर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More