मुंबई | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांनी शिवसेनेचे(Shivsena) बंडखोर आमदार घेऊन भाजपसोबत सत्ता स्थापन केली. तेव्हापासून महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. खरी शिवसेना कोणाची, ठाकरेंची की शिंदेची हा वाद कोर्टात देखील पोहोचला आहे. आतापर्यंत शिंदेंना पाठिंबा देणाऱ्यांना शिंदे गट असं म्हटलं जायचं, पण आता शिंदेंनी एक ट्वीट केल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे.
आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक धाडसाचं काम केलं आहे. एका ट्वीटमध्ये त्यांनी उद्धव ठाकरेंचा(Uddhav Thackray) उल्लेख करताना शिवसेना पक्षप्रमुख न करता उद्धव ठाकरे गट असा केला आहे. त्यांनी ग्रामपंचायत निवडणुकाचे निकाल जाहीर करताना, स्वत:च्या गटाला शिवसेना असं म्हटलं आहे, तर ठाकरे यांना ठाकरे गट असं म्हटलं आहे. यापूर्वी, शिंदेनी उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना पक्षप्रमुख असा उल्लेख टाळला होता.
शिंदे यांनी ट्वीटमध्ये म्हणलं आहे की, राज्यातील शिवसेना-भाजप(BJP) युती सरकारलाल जनतेचा कौल मिळाला आहे. शिवसेना भाजप युतीच्या सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन. निवडणूकीत मेहनत घेतलेल्या सर्व पदाअधिकारी, कार्यकर्ते आणि मतदार राजाचेही अभिनंदन आणि आभार.
दरम्यान, आता खरी शिवसेना कोणाची या वादासह पाच याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी सोमवारी म्हणजेच 8 ऑगस्टला होणार आहे. त्यामुळे या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. न्यायलयाच्या निर्णयानंतरच खरी शिवसेना कोणची या वादाला पूर्ण विराम मिळेल.
राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना – भाजपा युती सरकारला जनतेचा कौल…
शिवसेना – भाजपा युतीच्या सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन तसेच निवडणुकीत मेहनत घेतलेल्या सर्व शिवसेना – भाजपा युतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे तसेच मतदार राजाचे अभिनंदन आणि आभार… pic.twitter.com/2Y72CAFuSy
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) August 6, 2022
थोडक्यात बातम्या-
“पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे भारतीयांचा गौरव होतो”
संजय राऊतांनंतर आता काँग्रेसचा ‘हा’ बडा नेता अडचणीत
आयसीआयसीआय आणि पीएनबी बँकेच्या ग्राहकांना मोठा झटका!
दीपक केसरकर यांचा मोठा गौप्यस्फोट, राजकीय वर्तुळात खळबळ
‘मामी म्हणलेलं मला आवडतं, फार मजा येते’ -अमृता फडणवीस
Comments are closed.