बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

विधानसभेत एकनाथ खडसे आक्रमक; सरकारवर केली प्रश्नांची सरबत्ती

मुंबई |  विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन मुंबईत चालू आहे. या अधिवेशनात विरोधी पक्षनेत्याची कमी भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसेंनी आक्रमक होत भरून काढल्याचं चित्र आज सभागृहात दिसून आलं.

विधानसभेचं कामकाज सुरू होताच प्रश्नोत्तराच्या तासात खडसेंनी सरकारवर प्रश्नांची सरबत्ती केली. विरोधकांचे कमी अन खडसेंचेच प्रश्न जास्त होते, हे चित्र पाहायला मिळालं.

सौरपंपाच्या विषयावरून आणि नंतर आदिवासी भागातील कुपोषणाच्या विषयावरून एकनाथ खडसेंनी संबंधित मंत्र्यांना झापलं. तसंच नवीन आदिवासी मंत्र्यांच्या उत्तरावर खडेसेंनी नाराजी व्यक्त करत त्यांच्यावर संतापले.

दरम्यान, एकनाथ खडसे जवळपास साडेतीन वर्ष मंत्रीपदासून दूर आहे. ते भाजपवर नाराज असल्याचं वारंवार त्यांच्या बोलण्यातून आणि वक्तव्यांवरून दिसून येतं.

महत्वाच्या बातम्या

-केंद्रीय मंत्र्याच्या मुलाने केला हत्येचा प्रयत्न; पोलिसांनी आवळल्या मुसक्या

-श्रेयवादाच्या लढाईवरून अजित पवारांनी शिवसेना-भाजपला काढले चिमटे

-ड्रायव्हिंग लायसन्स काढणं झालं सोपं; गडकरींनी केला ‘हा’ नियम शिथील

-माझा वाघ कुठे आहे?; शहीद जवानाच्या आईने फोडला हंबरडा

-नरेंद्र मोदींनी राहुल गांधींना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा; म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More