Loading...

पक्षाविरोधी कामं करणाऱ्यांची चौकशी करून पक्षाने कारवाई करावी; एकनाथ खडसेंची मागणी

मुंबई | पक्षाविरोधी कामं करणाऱ्यांची नावं प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे पाठवली आहेत. त्यांनी चौकशी करुन विरोधी काम करणाऱ्यांवर कारवाई करावी, असं भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून पंकजा मुंडे भाजपवर नाराज असल्याच्या चर्चा आहेत. त्याच पार्श्वभूमीवर माजी शिक्षणमंत्री विनोद तावडेंची भेट घेऊन खडसे पंकजा मुंडेंच्या भेटीला पोहोचले. त्यानंतर त्यांनी आपली खदखद बोलून दाखवली आहे.

Loading...

पंकजा मुंडेंची घेतलेली भेट ही कौटुंबीक आहे. गोपीनाथ मुंडे माझे चांगले मित्र होते. पंकजा आणि रोहिणी यांचा पराभव का झाला? त्या कारणांवर चर्चा झाली. ज्यांनी पक्षाविरोधी कामगिरी केली, त्यांची नावं वरिष्ठांकडे पाठवली आहेत, आता कारवाईची प्रतीक्षा आहे, असं खडसे म्हणाले.

बहुजन नेतृत्त्वाला डावलणं हे दुर्दैवाने घडलं आहे. त्यांना तिकीटं न देणं किंवा तिकीट दिल्यानंतर निवडणुकीत त्यांचा पराभव करणे असं  हे घडलं आहे. 105 जण निवडून आले, पण जर नीट नियोजन केलं असतं तर भाजपचे आणखी आमदार निवडून आले असते, असंही एकनाथ खडसे म्हणाले.

 

Loading...

महत्वाच्या बातम्या-

 

 

Loading...

 

 

Loading...