बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

बहुजन नेतृच्व खच्ची करण्याचा प्रयत्न, भाजपात लोकशाही राहिली नाही- एकनाथ खडसे

मुंबई |  विधान परिषदेची उमेदवारी मागून देखील पक्षाने ती दिली नाही. शिफारस केली आहे असं सांगून आमच्याशी खोटं वागले, असा आरोप करत भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपच्या पक्षनेतृत्वावर गंभीर टीका केली आहे.

बहुजन समाजाच्या नेतृत्वाचं जर खच्चीकरण करत असाल, अशी विचित्र वागणूक जर मिळत असेल, तर पक्षाच्या वरिष्ठांकडे हे मांडण्याची आवश्यकता निर्माण झालेली आहे. भाजपमध्ये लोकशाही न राहिल्याचं चित्र आहे, अशी टीका खडसे यांनी केली आहे.

स्वतःकडे ज्यावेळस अधिकार येतात तेव्हा संघटनेला विश्वासात न घेता, मी पक्ष चालवतो, अशी भावना निर्माण होते. तेव्हा पक्षाची अशी वाताहत होते. आज भाजपाचं जे चित्र आहे, ते सामूहिक नाही. संघटित नाही. एकमेकांशी चर्चा करून निर्णय घेतले जात नाही. एखाद्यावेळी तर ते देखाव्यापुरते दाखवले जातात, असं एकनाथ खडसे म्हणाले

प्रदेश कार्य समितीच्या बैठका झाल्या, तर त्यामध्ये दोन तीन भाषणं होतात, पण कुणाला बोलू दिलं जात नाही. असे अनेक विषय आहेत. हे पक्षातंर्गत विषय आम्ही वरिष्ठांच्या कानावर घालणार आहोत. अशानं कसा पक्ष वाढेल? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

पक्षाचा विस्तार होईल, यापेक्षा एखाद्या व्यक्तीचा, व्यक्तिमत्वाचा विकास होईल, अशा स्वरूपाचं वातावरण आज भारतीय जनता पक्षामध्ये आहे. एखाद्या कुठल्यातरी व्यक्तीची हुकुमशाही चालवून घ्यायची आणि त्यांनीच निर्णय घ्यायचे. वरिष्ठांचे आशीर्वाद असल्यामुळे स्वतः सर्वस्वी समजायचं, हे जे भाजपात सुरू आहे. लोकशाही पद्धत आता भाजपात राहिलेली नाही, असं खडसे म्हणाले.

ट्रेंडिंग बातम्या-

लाॅकडाऊन 4ची घोषणा कधी होणार?, नरेंद्र मोदींनी दिली महत्त्वाची माहिती

कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली ‘ही’ मोठी घोषणा

महत्वाच्या बातम्या-

पंतप्रधानांना जर ठोस काही सांगायचं नसेल तर गोंधळाचं वातावरण कशाला निर्माण करता?; आंबेडकरांची टीका

आर्थिक पॅकेजची घोषणा पोकळ ठरू नये- बाळासाहेब थोरात

पुण्यात आजपर्यंतची कोरोनारूग्णांमध्ये सर्वांत मोठी वाढ, परंतू दिलासादायक बातमी देखील…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More