मुंबई | माझ्याबाबतीत जर हे असंच सुरू राहिलं तर माझा भरोसा धरू नका, असा इशारा भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पक्षाला दिला आहे. बीबीसी मराठीशी बातचित करताना त्यांनी हा इशारा दिला आहे.
भगवानगडावर पंकजा मुंडे यांनी घेतलेल्या मेळाव्याला मी गेलो असताना त्या मेळाव्यात देखील मी स्पष्टपणे सांगितलं होतं की जर मला असाच त्रास होत राहिला तर माझा भरोसा तुम्ही धरू नका. मी माझा स्वतंत्रपणे निर्णय घेईन. आताही तीच परिस्थिती आहे. सध्या कोरोनाचं राज्यावर संकट आहे. कोरोनाचं संकट दूर झाल्यावर कार्यकर्त्यांशी बोलून मी माझा निर्णय घेणार असल्याचं खडसे म्हणाले.
पंकजा मुंडे यांचं राजकीय भवितव्य धोक्याच आणण्याचा प्रयत्न होत असल्याची भावना देखील त्यांनी बोलून दाखवली. सध्याचं नेतृत्व पंकजा यांचं राजकीय करिअर धोक्यात आणत असल्याचा घणाघाती आरोप त्यांनी यावेळी केला.
दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी दिलेल्या मार्गदर्शकाच्या सल्ल्यावर एकनाथ खडसे म्हणाले. “माझं पक्षाला जेव्हा मार्गदर्शन पाहिजे होतं तेव्हा मी दिलं आहे. मी नेहमीच पक्षाला मार्गदर्शन केलं आहे. मी सक्रिय राजकारणातून निवृत्त होणारा माणूस नाहीये”
ट्रेंडिंग बातम्या
‘मला पण योगदान देऊ द्या’; पंतप्रधान मोदींच्या पॅकेजवर मल्ल्याचं ट्वीट
बिनविरोध आमदार म्हणून निवडून आल्यानंतर शशिकांत शिंदे यांचं कार्यकर्त्यांना आवाहन
महत्वाच्या बातम्या-
अडचणीत सापडलेल्या साखर उद्योगाला भरीव पॅकेज द्या; शरद पवारांचं पंतप्रधान मोदींना पत्र
बिल गेट्स यांनी मानले पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार, कारण…
गुजन्यूज… या शहरांमध्ये एकाच दिवशी 51 रुग्ण कोरोनामुक्त
Comments are closed.