Loading...

एकनाथ खडसे लवकरच राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार?

मुंबई | भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत, अशी माहिती आहे. राष्ट्रवादीतून या वृत्ताला दुजोरा मिळताना दिसतोय, तर भाजप ही राष्ट्रवादीची जुनी चाल असल्याचं म्हणतोय. 

भोसरी एमआयडीसीतील जमीन खरेदीमुळे खडसेंना महसूल मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. मात्र याप्रकरणी नेमलेली झोटिंग समिती निरर्थक असल्याचं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्यानं खडसेंचा मंत्रिमंडळ प्रवेशाचा मार्ग जवळपास बंद झाल्याचं कळतंय.

Loading...

दरम्यान, भाजपमध्ये कोंडी सुरु असलेेले खडसे राष्ट्रवादीच्या गळाला लागले आहेत. जळगावमध्ये अजित पवारांच्या उपस्थितीत एक मेळावा होणार असून या मेळाव्यात खडसेंसह अनेकजण राष्ट्रवादीत जाणार असल्याचं कळतंय. 

Loading...