आयुष्यभर कष्ट उपसूनही आम्ही सत्तेबाहेर आणि राणे सत्तेत!

आयुष्यभर कष्ट उपसूनही आम्ही सत्तेबाहेर आणि राणे सत्तेत!

धुळे | सत्ता मिळवण्यासाठी ज्यांनी आयुष्यभर कष्ट केले ते आज सत्तेबाहेर आहेत आणि नुकतीच पक्षाची स्थापना केलेले नारायण राणे यांना पक्षात घेण्याच्या हालचाली सुरु आहेत, अशा शब्दात भाजप नेते एकनाथ खडसे यांनी खंत व्यक्त केली. धुळ्यात आयोजित पुस्तक प्रकाशन समारंभात ते बोलत होते.

देशात परत लोकशाही रुजावी यासाठी आणीबाणीत अनेकांनी संघर्ष केला. त्यांनी संघर्ष केला नसता तर 18 राज्यांमध्ये भाजपचे मुख्यमंत्री दिसले नसते, असं खडसे म्हणाले.

दरम्यान, आणीबाणी हा स्वातंत्र्याचा दुसरा लढाच होता. तरुण पिढीला तो माहित व्हायला हवा. तो लिहिला जायला हवा, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

Google+ Linkedin