…तेव्हा मी पद्मावत सिनेमा पाहात होतो- एकनाथ खडसे

एकनाथ खडसे

दिल्ली | मी राहुल गांधींना भेटल्याची चर्चा आहे, मात्र त्यावेळी मी कुटुंबासह पद्मावत सिनेमा पाहात होतो, असं स्पष्टीकरण भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी दिलंय. काँग्रेस प्रवेशाच्या चर्चा त्यांनी यावेळी फेटाळून लावल्या आहेत. 

सामना वृत्तपत्राने एकनाथ खडसे दिल्लीत जाऊन राहुल गांधींना भेटल्याचं वृत्त दिलं होतं. मात्र सामनाची शोधपत्रकारिता कमी पडत असल्याचं एकनाथ खडसे यांनी म्हटलंय. 

विमानातून मी आणि काँग्रेस नेते एकत्र गेलो, मात्र ते मागे बसले होते आणि मी पुढे बसलो होतो. आमच्यात कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही, असं खडसे म्हणाले.