Top News विधानसभा निवडणूक 2019

पवारांची खेळी कधीही यशस्वी होणार नाही- एकनाथ खडसे

एकनाथ खडसे
Loading...

जळगाव | अजित पवारांची खेळी कधीही यशस्वी होणार नाही. सर्व विरोधक जरी एकवटले तरी रोहिणी खडसे निवडून येतील, असं वक्तव्य भाजपचे दिग्गज नेते एकनाथ खडसे यांनी केले आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.

मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे आणि  शिवसेनेचे चंद्रकांत पाटील यांच्यात लढत होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने आपला उमेदवार मागे घेत शिवसेनेच्या उमेदवाराला पाठींबा दिला आहे. यावरुन खडसेंनी हे वक्तव्य केलं आहे.

सच्चा शिवसैनिक कधीही बंडखोरी करणार नाही. बाळासाहेबांना मानणारा जो वर्ग आहे तो कधीही युती धर्माचा भंग करणार नाही. सच्चा शिवसैनिक कधीही गद्दारी करणार नाही, असंही खडसे यावेळी म्हणाले आहेत.

दरम्यान, एकनाथ खडसे यांना भाजपकडून उमेदवारी मिळण्याची अपेक्षा होती. मात्र, भाजपने खडसे यांना डावलून रोहिणी खडसे यांना मुक्ताईनगरमधून तिकीट दिलं आहे.

Loading...

महत्त्वाच्या बातम्या-

 

 

 

Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या