बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“होय मी कंत्राटी मुख्यमंत्री, माझ्याकडे या राज्याचा विकास करण्याचं कंत्राट”

मुंबई | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांच्या टीकेला उत्तर दिलं आहे. सर्व घटनात्मक तरतूदी, सोपस्कार पार पाडून, बहुमत सिद्ध करुन मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे, असंही शिंदे यांनी सभागृहात सांगितलं.

हे राज्य अधिक समृद्ध करण्याचं कंत्राट, सर्वसामानम्य जनतेला न्याय देण्याचं आणि आश्रू पुसण्याचं, लोकांमध्ये जाऊन त्यांचे प्रश्न सोडवण्याचं कंत्राट आपण घेतलं असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे.

उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्र्यांच्या कारकिर्दीत केंद्रीय मंत्री नारायण राणे भरल्या ताटावरुन अटक करण्यात आली होती. याची आठवणही शिंदे यांनी करुन दिली. मुख्यमंत्र्यांच्या विरोधात बोलले म्हणून ही अटक करण्यात आल्याची टीकाही शिंदे यांनी केली.

 

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More