शिवसेना खासदारांना घेऊन एकनाथ शिंदे मोदींना भेटणार?, फक्त हे 6 खासदार ठाकरेंसोबत!
मुंबई | शिवसेनेला सध्या कधी नव्हे ते मोठ्या राजकीय संघर्षाला सामोरे जावे लागत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर त्यांच्यासोबत शिवसेनेचे 40 आमदार रवाना झाले आणि त्यांनी सत्तांतर घडवून आणलं. त्यानंतर शिवसेनेने पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत अनेकांची शिवसेनेतून हाकलपट्टी केली. आता शिवसेनेच्या 18 खासदारांपैकी 12 खासदार शिंदेंच्या संपर्कात आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) काल रात्री उशीरा दिल्लीत दाखल झाले. ते शिवसेनेचे त्यांच्या गटातील खासदार घेऊन पंतप्रधानांना भेटणार आहेत. त्यामुळे आमदारांनंतर आता शिवसेनेचे खासदार देखील पक्षाच्या विरोधात भूमिका घेणार असल्याचं चित्र आहे. शिवसेनेचे 12 नव्हे तर 18 खासदार आपलेच आहेत, असं शिंदे पत्रकारांशी बोलताना म्हणाले.
सध्या सगळ्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची प्रतिक्षा आहे. त्यावर बोलताना शिंदे म्हणाले, लोकशाहीत आकड्याला म्हणजे बहुमताला महत्व आहे. आमच्याकडे बहुमत असून निकाल आमच्या बाजूनेच लागणार, असा दावा त्यांनी केला. तसेच खासदारांसोबत बैठक घेतल्यानंतर आम्ही अधिक माहिती देऊ असंही ते म्हणालेत.
एकनाथ शिंदेंच्या या पंतप्रधान नरेंद्र मोदी भेटीत खासदारांच्या गटाचा पाठींबा, मंत्रीमंडळ विस्तार आणि ओबीसी आरक्षण आदी गोष्टींवर चर्चा होणार आहे. शिवसेनेचे खासदार विनायक राऊत, अरविंद सावंत, राजन विचारे, गजानन किर्तीकर, बंडू जाधव आणि ओमराजे निंबाळकर आदी खासदार सोडले तर बाकी सगळे शिंदे गटाच्या वाटेवर आहेत असल्याचं कळतंय.
थोडक्यात बातम्या –
कोरोनानंतर आता डेंग्यूचा शिरकाव; ‘ही’ लक्षणे आढळल्यास ताबडतोब हॉस्पिटल गाठा
राज्यातील ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाकडून अलर्ट जारी
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची मोठी घोषणा; महाराष्ट्रातील ‘हा’ रस्ता होणार राष्ट्रीय महामार्ग
अमित शहांचे सहकारी सल्ला घेण्यासाठी शरद पवारांच्या भेटीला; खुद्द पवारांनी दिली माहिती
उद्धव ठाकरेंना एकाच दिवशी सलग पाच धक्के!
Comments are closed.