मुंबई | शिवसेनेचे जेष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी समर्थक आमदारांना सोबत घेत पक्षाविरोधात बंड केलं. एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीमुळे शिवसेनेच्या गोटात मोठी खळबळ उडाली असून एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील संघर्ष आता शिगेला पोहोचला आहे.
संध्याकाळी 5 पर्यंत मुंबईत परत या अन्यथा कारवाई करण्यात येईल, असा इशारा शिवसेनेनं गुवाहाटी येथे मुक्कामाला असलेल्या बंडखोर आमदारांना दिला होता. सुनील प्रभू यांनी याबाबतचं एक पत्रक देखील आमदारांना मेल केलं होतं. मात्र, आता एकनाथ शिंदेंनी ट्विट करत शिवसेनेचा मुख्य प्रतोदचं बदलला आहे.
सुनील प्रभू यांनी आजच्या आमदारांच्या बैठकीबाबत काढलेले आदेश कायदेशीरदृष्ट्या अवैध असल्याचं एकनाथ शिंदेंनी ट्विट करत सांगितलं आहे. तर शिवसेना विधिमंडळ मुख्य प्रतोद पदी एकनाथ शिंदेंनी शिवसेना आमदार भरत गोगावले यांची नियुक्ती केल्याची घोषणा केली आहे.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी केलेल्या या ट्विटमुळे चांगलीच खळबळ उडालेली पाहायला मिळत आहे. एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंच्या घोषणेविरोधात आता बंड पुकारला असून हा संघर्ष आणखी चिघळण्याची शक्यता आहे.
शिवसेना विधिमंडळ मुख्य प्रतोद पदी शिवसेना आमदार श्री.भरत गोगावले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सबब, श्री.सुनील प्रभू यांनी आजच्या आमदारांच्या बैठकीबद्दल काढलेले आदेश कायदेशीरदृष्ट्या अवैध आहेत.
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 22, 2022
थोडक्यात बातम्या-
‘उद्धव ठाकरेंची उलटी गिनती सुरु’, नवनीत राणा कडाडल्या
राज्यातील घडामोडींवर घटनाकार उल्हास बापट यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…
‘महाविकास आघाडीचं फार काळ टिकणारच नव्हतं’, उदयनराजे स्पष्टच बोलले
“जास्तीत जास्त काय होईल, सत्ता जाईल, सत्ता पुन्हा मिळवता येते, पण…”
आदित्य ठाकरेंनी उचललं मोठं पाऊल, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Comments are closed.