बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शिवसेनेच्या ‘या’ बड्या नेत्याला भाजपमध्ये येण्यास नारायण राणेंची खुली ऑफर

मुंबई | भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जनआशीर्वाद यात्रेची सुरूवात बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेऊन केली. त्यानंतर राज्यात शिवसेना-भाजपमध्ये वाद-विवाद घडून आलेत. अशातच नारायण राणे यांनी शिवसेनेच्या बड्या नेत्याला भाजपमध्ये येण्याची खुली ऑफर दिली आहे.

शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे फक्त शिवसेनेत नावापुरते मंत्री राहिलेले नेते आहेत. त्यांंना एकाही फाईलवर मातोश्रीला विचारल्याशिवाय सही करता येत नाही. ते शिवसेनेत कंटाळलेले आहेत. मी त्यांना फोन करणार आहे. ते जर आमच्या पक्षात आले तर त्यांचे स्वागतच आहे, असं नारायण राणे म्हणाले.

आमदार नीलम गोऱ्हे या माझ्यामुळेच शिवसेनेत आल्या आहेत. त्यांच्या आमदारकीसाठी मीच धडपड केली होती. परंतु आता त्यांच्याच पक्षात त्यांची किती फरफट होते. ते एकदा पहा म्हणावे, असं म्हणत नारायण राणेंनी नीलम गोऱ्हेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.

दरम्यान, आपण आर्थिक महासत्ता बननण्याच्या दिशेने जात आहोत.  देशातील 80 उद्योग माझ्याकडे येत आहे. आपल्या  देशातील आयात कमी झाली पाहिजे, त्याच बरोबर देशातून वस्तूंचा पुरवठा वाढला पाहिजे. लोकांना रोजगार मिळून त्यांचे आर्थिक उत्पन्न वाढण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे असंही राणे यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

“आपणच नियम करायचे आणि आपणच मोडायचे हे आमच्या रक्तात नाही”

राष्ट्रवादीचं महागाई विरोधात ‘जागरण गोंधळ’ आंदोलन; मुरळीचा व्हिडीओ तुफान व्हायरल!

अफगाणिस्तानात भारतीय नागरिक अपहरण प्रकरणात मोठा ट्विस्ट; आली ‘ही’ माहिती समोर

कौतुकास्पद! तरुणीने अपंगत्वावर मात करुन केला डान्स, पाहा व्हिडीओ

काय सांगता! कपाशीच्या पिकाला चक्क काकडी?, पाहा व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More