बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शिवसेनेने जारी केलेल्या व्हिपबद्दल एकनाथ शिंदे स्पष्टच बोलले, म्हणाले…

मुंबई | महाराष्ट्रात सुरू असलेल्या सत्तानाट्यावर अखेर 10 दिवसांनी पडदा पडला. अनेक राजकीय घडामोडींनंतर राज्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं नवं समीकरण पाहायला मिळालं.

ऐनवेळी एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेत सर्वांनाच धक्का दिला. त्यात विधानसभा अध्यक्षपदाची निवडणुक व बहुमत चाचणी उद्यावर असताना शिवसेनेनं व्हिप जारी केलं आहे. शिवसेनेनं जारी केलेल्या व्हिपवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्पष्टच बोलले आहेत.

बंडखोर आमदारांसोबत गोव्याहून मुंबईला परतत असताना शिंदेंनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी शिवसेनेचं व्हिप आम्हाला लागू होत नाही, असं स्पष्ट मत एकनाथ शिंदेंनी व्यक्त केलं आहे. आमच्याकडे दोन तृतीयांश आमदारांचं संख्याबळ आहे. त्यामुळे आम्ही बहुमत सिद्ध करू, असा विश्वास देखील एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राजन साळवी यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी जारी करण्यात आली आहे. तर राजन साळवी यांना मतदान करावं असा पक्षादेश शिवसेनेकडून जारी करण्यात आला आहे. तर शिवसेनेचा व्हिप आम्हाला लागू होत नसल्याचं एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे.

थोडक्यात बातम्या-

कोरोनाने टेंशन वाढवलं, 24 तासातील धडकी भरवणारी आकडेवारी समोर

‘शेवटी अंत जवळ आला आहे’, किरीट सोमय्यांची बोचरी टीका

“संजय राऊत कुठल्याही क्षणी राष्ट्रवादीत प्रवेश करु शकतात”

शिंदेंच्या मंत्रिमंडळातून चंद्रकांत पाटलांचा पत्ता कट?, महत्त्वाची माहिती समोर

“चित्राताई आपण गुलाबराव पाटलांचा गाल लाल करणार होतात, आता वचन नक्की पाळा”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More