बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

एकनाथ शिंदेंनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ; देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री

मुंबई | दोन आठवड्यांपासून राज्यातील राजकीय वातावरण तापलं होतं. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली होती. त्यामुळे महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं होतं. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांना हाताशी धरुन सरकार स्थापन केलं.

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदा मुख्यमंत्री झालेले नेते उपमुख्यमंत्री झाले आहेत.

राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. केंद्रीय नेतृत्वाच्या आग्रहानंतर देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यापासून सातत्याने दिवंगत बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या उच्चार केला आहे. आम्ही शिवसेना सोडली नसून शेवटपर्यंत सेनेतच राहणार आहे. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचा हिंदुत्वाचा विचार पुढे नेण्यासाठी हा निर्णय घेतल्याचंही त्यांनी सांगितलं.

थोडक्यात बातम्या- 

“सत्ता समोर आल्यानंतर मोह सोडायला संघाचे संस्कार आणि देवेंद्र फडणवीसांचे काळीज लागतं”

फडणवीसांची मोठी खेळी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सरकारचं रिमोट देवेंद्र फडणवीसांकडे?

देवेंद्र फडणवीसांसारखी माणसं राजकारणात दुर्मिळ, त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला- एकनाथ शिंदे

पुन्हा एकदा शिवसेनेचाच मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा

सर्वात मोठी बातमी! एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होणार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More