महाराष्ट्र मुंबई

“दाऊदच्या सात पिढ्या आल्या तरी मातोश्रीचं काही वाकडं करु शकणार नाही”

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान ‘मातोश्री’ उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. दाऊद इब्राहिमच्या नावे मुख्यमंत्र्यांना फोन आल्याची माहिती समोर येत आहे.

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या हस्तकाने हा फोन केल्याचं समोर येतं आहे.  हे धमकीचे फोन आल्यानंतर मातोश्री निवासस्थानी सुरक्षा वाढवण्यात आली आहे. यावर मंत्री एकनाथ शिंदेंनी प्रतिक्रिया दिली आहे.

मातोश्री हे मराठी माणसाचं सन्मानाचं स्थान आहे. दाऊद काय त्याच्या सात पिढ्या खाली आल्या तरी मतोश्रीचं वाकडं करु शकणार नाहीत, असं एकनाथ शिंदेंनी म्हटलं आहे.

पाकिस्तान देखील मतोश्रीचे वाकडे करु शकत नाही. दाऊद हा दुसऱ्याच आश्रय घेऊन राहतो. पोकळ धमक्यांना शिवसेना घाबरत नाही, असं एकनाथ शिंदे म्हणालेत.

महत्वाच्या बातम्या-

‘एकजूट होऊन कोरोनाशी लढूया’; ‘या’ भाजप नेत्याचं मुंख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र

खळबळजनक! दाऊद इब्राहिमच्या नावे मुख्यमंत्र्यांना फोन, ‘मातोश्री’ उडवण्याची दिली धमकी

‘….मूँह काला कर चुके है’; मनसेचा संजय राऊतांना टोला

मुलापाठोपाठ आमदार सुमन पाटील यांनाही कोरोनाची लागण

“घाबरु नका, कोरोना संपल्यावर आपलीच सत्ता येईल”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या