महाराष्ट्र मुंबई

…म्हणून आम्हाला आमचे आमदार फुटण्याची भीती नाही- एकनाथ शिंदे

मुंबई | उद्धव ठाकरेंचा निर्णय सर्व आमदारांना मंजूर आहे. तसेच सर्व आमदारांना उद्धव ठाकरेंवर विश्वास आहे म्हणून आमचे आमदार फुटण्याची आम्हाला भीती नाही, असं शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा आणखी वाढत चालला आहे. शिवसेना भवन येथे उद्धव ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली जिल्हाप्रमुखांची बैठक झाली. यानंतर एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद झाला. यावेळी सत्तास्थापनेचे सर्व अधिकार उद्धव ठाकरेंना दिलेले आहेत, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे.

आमदार निवासाचं काम सुरू असल्याने मुंबईबाहेरील सर्व आमदार रंगशारदामध्ये थांबले आहेत. रंगशारदामध्ये जेवढ्या खोल्या आहेत त्या कमी पडल्यास त्यांची दुसरीकडे व्यवस्था होऊ शकते, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

दरम्यान, शिवसेनेचे सर्व आमदार उद्धव ठाकरेंवर विश्वास ठेवून आहेत. जो काही निर्णय होईल ते सर्व त्या पाठीशी आहे, असंही शिंदे यांनी म्हटलंय.

महत्वाच्या बातम्या- 

 

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या