Top News महाराष्ट्र मुंबई

अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार की नाही, एकनाथ शिंदेंची सूचक प्रतिक्रिया

Photo Credit- Facebook/ Eknath Shinde

मुंबई | 1 मार्चला होणाऱ्या राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनावर कोरोनाचं सावट आहे. हे अधिवेशन रद्द करण्साठी राज्य सरकार कोरोनाग्रस्तांचे वाढते आकडे सांगत असल्याचा आरोप विरोधी पक्षाने केला आहे. त्यासोबतच राज्यातील अनेक मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली आहे त्यामुळे अधिवेशन होणार की नाही हा प्रश्न सर्वांना पडला आहे. मात्र अशातच राज्याचे नगरविकास मंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी यावर सूचक वक्तव्य केलं आहे.

25 फेब्रुवारीला विधिमंडळ कामकाजची बैठक आहे. अधिवेशन होऊ नये, असं सरकारचं मत नाही. मात्र जी वस्तुस्थिती आहे, कोव्हिडचा प्रादुर्भाव वाढतोय. ही चिंताजनक बाब आहे. याशिवाय मुख्यमंत्री जनतेच्या आणि सर्वांच्या हिताचे निर्णय घेताय त्यामुळे त्यात राजकारण आणू नये, असं म्हणतं एकनाथ शिंदेंनी अधिवेशन रद्द होऊ शकतं असे संकेत दिले आहेत. रायगडमध्ये सोमवारी न्हावा शेव्हा पाणीपुरवठा टप्पा 3 चं उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी एकनाथ शिंदे उपस्थित होते.

ज्या कार्यक्रमाचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांनी केलं तो कार्यक्रम लोकांच्या हितासाठी असलेल्या प्रकल्पासाठीचा होता. मोजके लोक प्रतिनिधी या कार्यक्रमात होते, सगळे नियम येथे पाळले गेले आहेत, त्यामुळे विरोधकांनी राजकारण करू नये, असंही शिंदे म्हणाले. याआधी मनसे नेते संदीप देशपांडे यांनीही अधिवेशनावरून शिवसेनेवर टीका केली होती.

दरम्यान, सावधान! सध्या कोरोनाचा नवीन स्ट्रेन आला आहे. त्याचं नाव विधिमंडळ अधिवेशन कोरोना असं आहे. जो शरीरावर कमी, पण स्वातंत्र्यावर अधिक परिणाम करतो. अधिवेशनात सरकारला प्रश्नांची उत्तरं द्यायची नाहीत, विधानसभा अध्यक्ष निवडणूक लांबणीवर टाकायची आहे, म्हणून कोरोनाची भीती दाखवली जात आहे, अशी टीका मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केली होती.

 

थोडक्यात बातम्या-

समीर गायकवाडचा अखेरचा ‘तो’ व्हिडीओ होतोय व्हायरल; चाहत्यांना म्हणाला….

जोपर्यंत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत तोपर्यंत महाराष्ट्रातून कोरोना जाणार नाही – निलेश राणे

‘आमच्या जिल्हयात सामना येतचं नाही’; पडळकरांचा शिवसेनेवर हल्लाबोल

बॅंकेत कर्मचारी सांगून केलं लग्न पण डोळ्याअंधारी करायचा ‘हे’ उद्योग

‘कृष्णकुंजवर न्याय मिळतो’; मावळवासियांकडून राज ठाकरेंचे आभार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या