“महाराष्ट्राचे 3 तुकडे करण्याचा दिल्लीचा विचार, तुम्ही भाजपच्या हो ला हो केलं तर मुंबई हातची जाईलच”
मुंबई | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रीपदाची सूत्र सांभाळल्यानंतर कामांना वेग दिला आहे. काल त्यांनी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री अमित शहाची दिल्लीत (Delhi) भेट घेतली. यावर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी सामनाच्या अग्रलेखातून टीका केली आहे. महाराष्ट्रात आता पैशाचा पाऊस पडेल. हात पुढे केल्यावर हवं ते मिळेल. अशाप्रकारे पुन्हा एकदा सामनामधून एकनाथ शिंदे यांना टोला लगावण्यात आला.
मुख्यमंत्री शहांना भे़टले त्यांच्या गटास मंत्रीपद मिळावं म्हणून जर ते भेटले असतील तर काही बोलू शकत नाही. भाजपला(BJP) महाराष्ट्राचे तीन तुकडे करायचे आहेत. मुख्यमंत्री जर भाजपच्या हो ला हो करत बसले तर मुंबई हातची जाईल. यासाठी शिवसेना नेहमी आवाज उठवेल, कारण हाच आवाज महाराष्ट्राचा आहे आणि राहील, असा इशारा सामनातून देण्यात आला आहे.
दिल्लीली जस हवं तस आता महाराष्ट्रात घडत आहे. शिंदे यांनी त्यांना हवं तस करू दिलं आहे. राहता राहिला प्रश्न महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा आणि अंखडतेचा. महाराष्ट्राचे तीन तुकडे करून तीन वेगळी राज्ये निर्माण करण्याचा विचार दिल्लीच्या मनात आहे आणि त्याची लवकरच अंमलबजावणी होईल, असं कर्नाटकातील (Karnataka) भाजपचे मंत्री जाहीरपणे बोलतात. यावर संगळे शांत का? यामागे यांचा छुपा पाठिंबा तर नाही ना?, असा सवाल सामनातून करण्यात आला आहे.
बेळगाव (Belgaum) सीमेवर सध्या आपल्या मराठी बांधवावर अन्याय सुरू आहे. त्या भागात जाऊन शिंदेनी अन्यायाचे परिमार्जन करावं. शिंदे यांच्याकडे यापूर्वी सिमा भागाची जबाबदारी होती. आता ते भाजपच्या पाठिंब्याने मुख्यमंत्री झाले आहेत त्यामुळे कर्नाटकातील भाजप सरकार त्यांच नक्की ऐकेल, असा टोला लगावला आहे.
थोडक्यात बातम्या
काँग्रेस नेत्याने अग्निपथ योजनेशी जोडला शिंजो आबेंच्या मृत्यूशी संबंध, म्हणाले…
शिंदे-फडणवीस अमित शहांच्या भेटीला, तिघांमधील बैठक रात्री 2 वाजता संपली
अमरनाथमध्ये ढगफुटी; आतापर्यंत 15 भाविकांचा मृत्यू
‘खाली काही घातलं की नाही?’; ‘त्या’ व्हिडीओमुळे मलायका अरोरा सोशल मीडियावर ट्रोल
‘मी व्हॅनिटी व्हॅनमध्येही सेक्स केलाय, रिस्क असते पण…’; रणवीरने सांगितला तो किस्सा
Comments are closed.