बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मतदान सुरू असताना एकनाथ शिंदेंनी प्लॅनिंग केलं?; महत्त्वाची माहिती समोर

मुंबई | विधानपरिषदेची निवडणूक झाल्यानंतर कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे अचानक गायब झाले आहेत. काल विधानपरिषद निवडणुकीवेळीच काही आमदारांना त्यांनी फोन केल्याची माहिती समोर आलीये. धक्कादायक म्हणजे त्यांच्यासोबत आणखी 25 आमदार आहेत. हे सगळे आमदार गुजरातच्या सुरतमध्ये पोहचले आहेत. या सगळ्याचं प्लॅनिग एकनाथ शिंदेनीं विधानपरिषद निवडणुकीवेळी केल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

एकनाथ शिंदेंनी कालच त्यांचासोबत इतर 30 आमदारांचं तिकिट बुक केल्याचं समोर आलं आहे. काल विधानपरिषद निवडणूक पार पडली. शिवसेनेचा विजय झाला, मात्र शिवसेनेची काही मत फुटल्याने आमदारांमध्ये नाराजी पसरली आहे. आपली भूमिका मांडण्यासाठी आज दुपारी 12 वाजता एकनाथ शिंदे आपली भूमिका मांडणार आहेत.

25 आमदारांसह एकनाथ शिंदे हे गुजरातमधील एका हॅाटेलमध्ये निवासस्थानी आहेत. हॅाटेलबाहेर कडक सुरक्षा ठेवण्यात आली आहे. भाजपचे काही आमदार एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन अहमदाबादकडे रवाना झाल्या असल्याची माहिती सुत्राकडून मिळाली आहे.

या घडामोडीमुळे आता काँग्रेसकडून आपले आमदार जपण्याची तयारी केली जात आहेत. दरम्यान कालची विधानपरिषद निवडणुक भाजपने जिंकल्याने भाजपचे संख्याबळ 134 इतकं झाल आहे. यामुळे भाजप आता महाविकास आघाडी विरूद्ध अविश्वास ठराव मांडण्याची शक्यता असल्याची चर्चा सुरु आहे.

थोडक्यात बातम्या 

महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार?, विजयानंतर देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य

मोठी बातमी! फडणवीसांची रणनिती यशस्वी, महाविकास आघाडीचे मतं फोडण्यात भाजपला यश

रूग्णालयातून डिस्चार्ज मिळताच सोनिया गांधींना ईडीकडून समन्स जारी

केंद्रीय निवडणूक आयोगाचाही काँग्रेसला दणका, मतमोजणीला सुरूवात

“कोणी कितीही पावसात भिजलं तरी निवडून येणार नाही”

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More