महाराष्ट्र मुंबई

सरपंचपदाचा लिलाव करणाऱ्या ‘या’ गावांना निवडणूक आयोगाचा झटका!

मुंबई | ग्रामपंचातींमध्ये सरपंचपदांसाठी लिलाव जाहीर करून बोली लावणाऱ्या गावांना निवडणूक आयोगाने दणका दिला आहे.

निवडणूक आयोगाने सरपंच आणि सदस्यपदांसाठी बोली लावणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील उमराणे आणि नंदुरबार जिल्ह्यातील खोंडामळी या गावातील ग्रामपंचायत निवडणूक रद्द केली आहे.

सरपंच आणि सदस्यपदांचा जाहीर लिलाव झाल्याबद्दलचे पुरावे प्राप्त झाल्यामुळे या ग्रामपंचायतींची संपूर्ण निवडणूक प्रक्रिया रद्द करण्यात आल्याचं कळतंय.

काही ग्रामस्थांच्या एकतर्फी दबावात्मक निर्णयामुळे इच्छूक उमेदवारांना मुक्त वातावरणात निवडणूक लढवण्यापासून आणि मतदारांना मतदानापासून वंचित ठेवण्याचा प्रकार या दोन्ही गावांमध्ये झाला आहे. निर्भय, मुक्त व पारदर्शक वातावरणात निवडणूक घेण्याची संविधानिक जबाबदारी राज्य निवडणूक आयोगावर आहे. ही संविधानात्मक जबाबदारी पार पाडण्यासाठी आयोगाने या दोन्ही ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया रद्द केली आहे, असं राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या-

ड्रग्ज प्रकरणी नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना एनसीबीकडून अटक!

‘एकदा सत्य बाहेर आलं की…’; धनंजय मुंडे प्रकरणावर फडणवीसांचं मोठं वक्तव्य

‘शरद पवारांचं राजकारण शुद्ध, त्यांच्यावर…’; चंद्रकांत पाटील यांचं मोठं वक्तव्य

तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली; आता ‘या’ विभागाची सांभाळणार जबाबदारी

धनंजय मुंडेंचा राजीनामा मागणाऱ्या विरोधकांना अमोल कोल्हेंनी सुनावलं, म्हणाले…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या