बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

CET परीक्षेच्या रजिस्ट्रेशनसाठीची वेबसाईट बंद; अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांना मिळणार मुदतवाढ

मुंबई | इयत्ता दहावीचा निकाल लागल्यानंतर आता लगेचच इयत्ता अकरावीच्या प्रवेशाची लगबग सुरू झाली आहे. राज्य शासनाच्या निर्णयानुसार आता अकरावी प्रवेशासाठी सीईटी घेतली जाणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यासाठी येत्या 19 जुलैपासून ऑनलाईन नोंदणीस सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती राज्य मंडळानं दिली. अशातच आता रजिस्ट्रेशनची वेबसाईट राज्य शिक्षण मंडळाकडून बंद करण्यात आली आहे.

सीईटी अर्ज भरण्यासाठी परवापासून म्हणजेच 20 जुलैपासून सुरुवात झाली. अर्ज भरण्यासाठी शेवटची तारीख 26 जुलैपर्यंत सांगण्यात आली होती. मात्र तांत्रिक अडचणी आल्यामुळं सध्या प्रवेश अर्जाचे संकेतस्थळ बंद आहे. त्यामुळे विद्यार्थी व पालकांनी संताप व्यक्त केला आहे.

तांत्रिक कारणामुळे सीईटी प्रवेश अर्जाचे संकेतस्थळ बंद आहे. संकेतस्थळ सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांना कळवलं जाईल. तसेच सीईटी अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात येईल. त्याचप्रमाणे हेल्पलाईन क्रमांक सुरू ठेवण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या जातील, असं राज्य मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी सांगितलं.

दरम्यान, यंदा इयत्ता दहावीचा निकाल 99.95 टक्के लागला आहे. तर यामध्ये तब्बल 957 विद्यार्थ्यांना 100 पैकी 100 टक्के गुण मिळाले आहेत. म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी 5 टक्के जास्त विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण मिळाले आहेत.

थोडक्यात बातम्या – 

‘रात्री अपरात्री लोकांचे फोन यायचे…’; खासदार मनोज झा यांचं मन सुन्न करणारं भाषण

कोरोना व्हायरसचा होऊ शकतो मेंदूवर परिणाम; धक्कादायक माहिती आली समोर

काश्मीर पुनश्च भारताचं नंदनवन म्हणून ओळखलं जाईल- भगतसिंह कोश्यारी

देवेंद्र फडणवीसांना मोठा धक्का; ‘या’ योजनेची चौकशी होण्याची शक्यता

बरं झालं स्वामी बोलले, नाहीतर राष्ट्रदोह झाला असता- यशोमती ठाकूर

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More