बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

एलॉन मस्क यांनी तब्बल ‘इतके’ पैसे मोजत खरेदी केलं ट्विटर

नवी दिल्ली | सर्वात मोठ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मपैकी एक असलेलं ट्विटर (Twitter) जगभर लोकप्रिय आहे. मात्र, जगातील या सर्वात मोठ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची विक्री झाली आहे. जगातील श्रीमंत व प्रसिद्ध व्यक्ती एलॉन मस्क (Elon Musk) हे आता ट्विटरचे मालक झाले आहेत.

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत एलॉन मस्क यांचं नाव आहे. एलॉन मस्क यांनी तब्बल 44 अब्ज डॉलर्समध्ये ट्विटरची खरेदी केली आहे. एलॉन मस्क यांनी $54.20 प्रति शेअर या दराने ट्विटर कंपनी विकत घेतली आहे.

एलॉन मस्क यांनी काही काळापूर्वी ट्विटर कंपनीत 9% हिस्सेदारी विकत घेतली होती. त्यानंतर 44 अब्ज डॉलर्समध्ये एलॉन मस्क यांनी ट्विटर लिंकचा 100 टक्के हिस्सा खरेदी केला आहे.

दरम्यान, ट्विटरमध्ये प्रचंड क्षमता आहे. ट्विटरचा एक उद्देश आणि प्रासंगिकता आहे. मला त्यात नवीन वैशिष्ट्ये जोडून ते पूर्वीपेक्षा जास्त चांगलं बनवायचं आहे. मी कंपनीसोबत काम करण्यास उत्सुक आहे, असं मत ट्विटरचे नवे मालक एलॉन मस्क यांनी व्यक्त केलं आहे.

थोडक्यात बातम्या-

मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करत नितेश राणेंनी दिलं थेट आव्हान, म्हणाले…

“सोनिया गांधींसमोर झुकताय म्हणून तर मुख्यमंत्र्यांना मानेचा त्रास होतोय”

“अमोल मिटकरी हा राष्ट्रवादीच्या तमाशाच्या फडावरचा नाच्या”

दादागिरी करून याल तर ती मोडून काढू, दादागिरी कशी मोडायची हे…- उद्धव ठाकरे

“…म्हणून प्रशांत किशोर काॅंग्रेसमध्ये प्रवेश करता करता थांबले”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More