Russia Ukraine War: एलोन मस्कचं पुतीन यांना खुलं आव्हान, म्हणाले…
नवी दिल्ली | रशिया आणि युक्रेन युध्दाने जग दोन गटात विभागलं गेल आहे. काही बलाढ्य देश युक्रेनच्या बाजूने आहेत. तर काही रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांचं समर्थन करत आहे.
स्पेसएक्सचे सीईओ एलोन मस्क यांनी पुतीन यांना खुलं आव्हान दिलं आहे. मस्क म्हणाले आहेत, आमने-सामनेच्या लढाईसाठी पुतीन तयार आहेत का, या सिंगल सामण्यात युक्रेन पणाला लागले असेल. रशियन भाषेत करण्यात आलेल्या ट्विटला पुतिन यांच्यासाठी थेट आव्हान मानले जात आहे.
अनेक युजर्सचे म्हणणे आहे की, रशियाचे राष्ट्रपती हा सामना सहज जिंकतील. यावर उत्तर देताना मस्क म्हणाले, जर पुतिन पाश्चिमात्य देशांना सहज अपमानित करू शकत असतील, तर त्यांनी आव्हान स्वीकारायला हवे, पण ते तसे करणार नाहीत.
दरम्यान, टेस्ला आणि स्पेसएक्सचे सीईओ असलेले एलोन मस्क हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहेत. तर एलोन मस्क उघडपणे युक्रेनच्या बाजूनं उभे राहण्याची ही पहिलीच वेळ नाही.
थोडक्यात बातम्या –
‘शैक्षणिक संस्थामध्ये हिजाब बंदी योग्य’; उच्च न्यायालयचा मोठा निर्णय
मुळशी पॅटर्नमधील ‘ती’ चहावाली अभिनेत्री आज कोट्यावधींची मालकीण, वाचा काय करतेय काम
IPL 2022: BCCI नं आयपीएल नियमांमध्ये केले ‘हे’ मोठे बदल
इंधन दरात काय बदल झाला?, वाचा आजचे ताजे दर
वारंवार तहान लागणंही शरिरासाठी ठरु शकतं घातक, वाचा काय आहे कारण
Comments are closed.