देश

महात्मा फुलेंना ‘भारतरत्न’ देण्यात यावा; काँग्रेस खासदाराची मागणी

नवी दिल्ली | देशातील पहिल्या सामाजिक क्रांतीचे उद्घोषक महात्मा जोतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांना ‘भारतरत्न’ या सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरविण्यात यावं, अशी मागणी काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई यांनी राज्यसभेत केली.

1848 साली शाळा सुरू करणारे पहिले भारतीय ठरलेले महात्मा फुले यांनी सदैव सर्व धर्मांना सोबत जोडून विकास आणि शिक्षणावर भर दिला. त्यामुळे त्यांचा भारतरत्न सन्मान करण्यात यावा, अशी मागणी दलवाई यांनी केली.

देशात महिलांचे, शिक्षणाचे, दलितांचे आणि शेतकऱ्यांचे प्रश्न उपस्थित करणारे महात्मा फुले आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाईंनी उपेक्षित, वंचितांसाठी आयुष्य वेचलंं, असंही दलवाई यांनी संगितलं.

दरम्यान, 2018 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही केंद्राकडे महात्मा फुलेंना भारतरत्न करण्याची शिफारस केली होती.

ट्रेंडिंग बातम्या-

चिमुरडी कोल्हेंना म्हणाली, ‘बाहेर जाऊ नका ते तुम्हाला पकडतील’…

मुंबईच्या डबेवाल्यांना हक्काची घरं मिळणार- अजित पवार

महत्वाच्या बातम्या-

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या