आयपीएलला प्राधान्य देणाऱ्या खेळाडूंवर कारवाई व्हावी; ‘या’ खेळाडूच्या मागणीनं खळबळ
मुंबई | इंग्लंड संघाचे माजी कर्णधार जोफ्री बाॅयकाॅट यांनी आयपीएल खेळणाऱ्या इंग्लंड संघाच्या खेळाडूंवर टीका करत इंग्लंड बोर्डाकडे (इसीबी) तक्रार केली आहे. बाॅयकाॅट यांनी इसीबीकडे संघाला प्राधान्य न देता आयपीएल खेळणाऱ्या खेळाडूंबद्दल तक्रार केली आहे. तसेच त्यांना शिक्षा करावी आणि वेतनात कपात करण्यात यावी, अशी मागणी देखील केली आहे.
काही दिवसांपूर्वी इंग्लंड संघाचे मुख्य प्रशिक्षक ख्रिस सिल्वरवुड यांनी इंग्लंडचे खेळाडू आयपीएल स्पर्धेसाठी पूर्ण वेळ उपस्थित असतील, असं म्हणाले होते. या पार्श्वभूमीवर बाॅयकाॅट यांनी इसीबीकडे तक्रार केली आहे. इंडियन प्रीमियर लीगच्या 14 व्या हंगामाला येत्या 9 एप्रिल पासून सुरुवात होणार आहे. तसेच या स्पर्धेचा अंतिम सामना 30 मे रोजी खेळवण्यात येणार आहे.
यावर्षीच्या जून महिन्याच्या सुरुवातीला इंग्लंड संघ न्यूझीलंड संघाविरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. तसेच 30 मे रोजी आयपीएलचा अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे. अशातच अंतिम सामन्यात पोहोचणाऱ्या संघाकडून खेळणाऱ्या इंग्लंडच्या खेळाडूंना न्यूझीलंड विरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेतील सुरुवातीच्या सामन्यांना मुकावे लागू शकते.
दरम्यान, इंग्लंड संघाकडून बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चर, मोईन अली, इऑन मार्गन, जाॅस बटलर यांसोबत 13 खेळाडू आयपीएल स्पर्धा खेळणार आहेत. त्यामुळे आयपीएलमध्ये जो संघ प्लेऑफमध्ये प्रवेश करेल त्या संघातील इंग्लंडचे खेळाडू न्यूझीलंड विरुद्ध होणाऱ्या मालिकेसाठी उपलब्ध नसतील. तसेच इंग्लंड बोर्डाने देखील खेळाडूंना संपूर्ण आयपीएल स्पर्धा खेळण्याची परवानदी दिली आहे.
थोडक्यात बातम्या –
मंत्री बाळासाहेब थोरातांच्या बंगल्यातच आत्महत्येचा प्रयत्न झाल्यानं मोठी खळबळ
पुणे पोलिसांकडून गुन्हेगारांना मोठा धक्का; 2 कुख्यात टोळ्यांमधील ‘या’ 13 जणांवर मोक्का!
…म्हणून या माणसाने चक्क कांगारुच्या कानाखाली वाजवली, कांगारुही हैराण, पाहा व्हिडीओ
धक्कादायक!; अवघ्या चार ते पाच हजार रुपयात कोरोनाच्या बनावट अहवालाची विक्री
रेल्वे प्लॅटफॉर्मवर पाय ठेवणं आता आणखी महाग; 50 रुपये मोजावे लागणार!
Comments are closed.