बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

इंग्लंडच्या मदतील आला पाऊस, पहिला कसोटी सामना अनिर्णित!

मुंबई | भारत आणि इग्लंड विरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताची पकड मजबूत माणली जात होती. मात्र पावसाने भारताच्या विजयाच्या आशेवर पाणी फेरलं आहे. कसोटीच्या अखेरच्या दिवशी भारताला 98 षटकांमध्ये 157 धावांची गरज होती. शेवटच्या दिवशी एकही चेंडू टाकता आला नाही. त्यामुळे पहिला कसोटी सामना हा अनिर्णित राहिला आहे.

पंचांनी चहापानापर्यंत पाऊस थांबण्याची वाट पाहिली मात्र तरीही पाऊस चालू असल्याने अखेर सामना न खेळवण्याचा निर्णय घेतला. या कसोटीमध्ये पहिल्या डावात अर्धशतक आणि दुसऱ्या डावात शतक ठोकणाऱ्या इंग्लंडच्या कर्णधाराला सामनावीरचा पुरस्कार देण्यात आला.

भारताने इंग्लंडला पहिल्या डावात 183 धावांच्या आत रोखलं होतं. मात्र भारताचीही पहिल्या डावातील फलंदाजी चालली नाही तरीसुद्धा भारताने 92 धावांची आघाडी घेतली होती. इंग्लंडने दुसऱ्या डावात 303 धावा केल्या. त्यानंतर भारत फलंदाजीला आल्यानंतर भारताने 52 धावांमध्ये एक गडी गमावला होता. मात्र त्यानंतर पावसाने सर्व सामना फिस्कटवला.

दरम्यान, या कसोटी सामन्यामध्ये भारतीय वेगवान गोलंदाजांनी घातक मारा केला. भारताचे तिन्ही गोलंदाज प्रभावी ठरले. फलंदाजांनी मात्र निराशा केली. कर्णधार विराट कोहली, उपकर्णधार अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा यांनी निराशाजनक कामगिरी केली.

थोडक्यात बातम्या-

मोठी बातमी! मुंबई लोकलसेवा सुरू, मात्र काढावा लागणार ‘हा’ पास

शाब्बास पुणेकरांनो! पुण्यातील नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट, वाचा दिलासादायक आकडेवारी

मराठे गोष्टी सांगत नाहीत तर ते इतिहास रचतात- उद्धव ठाकरे

“महाराष्ट्रातले भाजपचे नेते मोदींचं पण ऐकत नाहीत”

“राहुल गांधी ज्यांच्या खांद्यावर हात ठेवतात तो पक्ष रसातळाला जातो हा इतिहास”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More