Top News खेळ

कोरोनानंतरचा पहिलाच क्रिकेट सामना; ‘या’ संघानं मिळवला थरारक विजय

#ENGvsWI | कोरोनानंतर खेळल्या गेलेल्या पहिल्याच क्रिकेट सामन्यात चांगलाच थरार पहायला मिळाला. इंग्लंडने पाचव्या दिवशी वेस्ट इंडिजपुढे ठेवलेल्या २०० धावांच्या लक्ष्याचा इंडिजने यशस्वी पाठलाग करत थरारक विजयाची नोंद केली. 

जेरमीन ब्लॅकवूड हा वेस्ट इंडिजच्या विजयाचा शिल्पकार ठरला, मात्र त्याचे शतक अवघ्या ५ धावांनी हुकले, तर वेस्ट इंडिजच्या विजयावरही त्याला शिक्कामोर्तब करुन देता आलं नाही, मात्र या सामन्यात वेस्ट इंडिजने चार गडी राखून इंग्लंडवर मात केली.

इंग्लंडने आपल्या दुसऱ्या डावात ३१३ धावा केल्या आणि विंडीजपुढे विजयासाठी २०० धावांचं आव्हान ठेवलं होतं. विंडीजसाठी ही लढत सोपी नव्हती कारण इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर भेदक गोलंदाजी करत होता.

जोफ्रा आर्चरच्या एका खतरनाक चेंडूमुळे विंडीजचा सलामीवीर जॉन कॅम्बेल दुखापतग्रस्त झाला, त्याला मैदान सोडावं लागलं. त्यानंतर जोफ्रा आर्चरनं विंडीजला तीन धक्के दिले मात्र जेरमीन ब्लॅकवूडनं खेळपट्टीवर ठाण मांडलं. त्यानं रोस्टन चेस (३७) सोबत ७३ धावांची भागीदारी रचली, ही भागीदारी निर्णायक ठरली.

 

महत्त्वाच्या बातम्या-

ज्योतिरादित्य शिंदेंचं सचिन पायलट यांच्यासाठी ट्विट, शिंदें म्हणतात…

हा घ्या पुरावा…RSS स्वयंसेवकांनी धारावीत काम केल्याचा- चित्रा वाघ

सचिन पायलट यांना मोठा धक्का; परतलेल्या 3 आमदारांचं धक्कादायक वक्तव्य

शरद पवारांनी एनडीएमध्ये येऊन नरेंद्र मोदींसोबत काम करावं, केंद्रीय मंत्र्याचं निमंत्रण

संजय राऊतांचं भाजपला ओपन चॅलेंज; “हिंमत असेल तर महाराष्ट्रात ‘हे’ करुन दाखवा!”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या