पुणे | महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बापू पठारे पुन्हा स्वगृही परतणार अशा चर्चांणा उधाण आलं आहे. यावर बापू पठारेंनी आपली प्रतिक्रिया देत चर्चांणा पुर्णविराम दिला आहे.
2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर मी एकदाही अजित पवार यांना भेटलो नसून विरोधकांकडून मुद्दाम खोट्या दिशाभूल करणाऱ्या अफवा आणि बातम्या पसरविल्या जात आहेत. मी भाजपमध्ये समाधानी आहे, असं बापुसाहेब पठारे यांनी म्हटलं आहे.
2019 च्या विधानसभा निवडणुकीवेळी राष्ट्रवादीचे माजी आमदार बापूसाहेब पठारे यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील टिंगरे यांच्या प्रचारार्थ 14 ऑक्टोबर अजित पवार यांची सकाळी दहा ते दोन वाजेपर्यंत भव्य रॅली काढली होती. त्याच दिवशी संध्याकाळी सात वाजता भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे सर्वांना धक्का बसला होता.
दरम्यान, बापू पठारे अजित पवारांचे कट्टर समर्थक मानले जात होते. त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे अजित पवारांनी अनेक सभेत त्यांच्या प्रवेशाचे नाट्य सर्वत्र बोलून दाखवलं होतं.
थोडक्यात बातम्या-
शेतकरी कुठलाही असो त्यांना सन्मानाची वागणूक द्या- रोहित पवार
…त्यांनी बिबट्यालाही सोडलं नाही; शिजवून खाल्लं!
‘…तर मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसू’; प्रवीण दरेकरांचा सरकारला इशारा
फक्त ‘जय हिंद’ किंवा ‘जन गण मन’ म्हणणे म्हणजे राष्ट्रभक्ती नाही- व्यंकय्या नायडू
‘काँग्रेसनेच सुभाषचंद्र बोस यांची हत्या केली’; भाजप खासदाराचं वादग्रस्त वक्तव्य