मुंबई | राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल लागला यामध्ये काही ठिकाणी अनपेक्षित असे निकाल लागले तर काही बड्या नेत्यांच्या बालेकिल्यांना सुरूंग लागले. मात्र सावंतवाडी तालुक्यातील इन्सुली ग्रामपंचायतीचा निकाल हा बाकी निकालच लागला आहे.
भाजपा आणि शिवसेनेला समान जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे अपक्ष उमेदवार कोणाच्या पारड्यात आपलं वजन टाकणार यावर येथील ग्रामपंचायतीचं भवितव्य अवलंबून असणार आहे.
दोन्ही पक्षांना पाच आणि पाच अशा समान जागा मिळाल्या आहेत. या निवडणुकीत स्वागत नाटेकर हे अपक्ष म्हणून निवडून आले आहेत ते मूळचे भाजपचे असल्याने नाटेकर कोणाला साथ देतात यावर तेथील सत्ता ठरणार आहे.
दरम्यान, इन्सुली ग्रामपंचायतीच्या निकालाची तालुक्यात चर्चा आहे. ना. मुख्यमंत्री गणप्या गावडे या चित्रपटातील पटकथेप्रमाणे या गावची सत्ता अपक्षाच्या हातात गेली आहे.
थोडक्यात बातम्या-
आईविरोधात वडिलांचं पॅनल उभं करणाऱ्या पिशोरी ग्रामपंचायतीचा पाहा काय लागला निकाल!
पाटोद्यात पेरे पाटील हरले, हिवऱ्यात पोपटराव जिंकले; अण्णांच्या राळेगणमध्ये काय झालं?
कोरोनामुळं बायकोचं चुंबनही घेतलं नाही, मग…- फारूक अब्दुला
“राज्यातील सहा हजारपेक्षा अधिक ग्रामपंचायतींमध्ये कमळ फुलणार”
नविन पॉलिसी मान्य नसेल, तर व्हॉट्सअॅप डिलीट करा- दिल्ली उच्च न्यायालय