बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुण्यातील तात्पुरत्या कारागृहातून 2 कोरोनाबाधित कैद्याचं पलायन

पुणे | राज्यात कोरोनाने थैमान घातलं आहे. मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांमध्ये कोरोनाचे रूग्ण वाढताना दिसतायत. हे प्रमाण रोखण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. तर कारागृहातील कैद्यांना कोरोनाची बाधा होऊ नये यासाठी काही कैद्यांची तात्पुरत्या कारागृहात पाठवणी करण्यात आलेली आहे.

तर पुण्यात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. तात्पुरत्या कारागृहाचा फायदा घेत कैद्यांनी पलायन केलं आहे. पुण्यातील तात्पुरत्या कारागृहातून दोन कोरोनाबाधित कैदी पळून गेल्याची घटना घडली आहे.

पुण्यातील येरवडा कारागृहापासून जवळच्या अंतरावर असलेल्या सावित्रीबाई फुले वसतिगृहाचं तात्पुरत्या कारागृहात रूपांंतर केलं आहे. या ठिकाणी 604 कैद्यांना ठेवण्यात आलंय. तर यापैकी दोन जण कोरोनाबाधित आढळले असून आज रात्रीच्या सुमारास हे दोघे खिडकीतून बाहेर पळून गेलेत.

येरवाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री एकच्या सुमारास हे दोन कैदी पळाले आहेत. हे कैदी कोरोनाबाधित आहेत. याची खबऱ मिळताच त्यांच्या शोधासाठी पोलीस पथकं रवाना केली आहेत.

महत्वाच्या बातम्या-

सिरम इन्स्टिट्युटच्या ‘या’ ट्विटमुळे भारतीयांचं टेन्शन वाढलं!

राज्यात कोरोनाचा कहर; दिवसभरात 23 हजार 446 नव्या कोरोना बाधितांची नोंद

“सुशांतच्या मृत्यूचा राजकीय ट्रम्प कार्ड सारखा वापर केला जातोय”

‘माझं सौभाग्य आहे की तुम्ही आमच्या घरी आलात’; आठवलेंनी घेतली कंगणा राणावतची भेट

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More