बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“कोरोनाच्या संकटातही काही लोक दहशतवाद, बनावट व्हिडीओंचा व्हायरस पसरवत आहेत”

नवी दिल्ली | कोरोनाच्या संकटातही काही लोक दहशतवाद, बनावट व्हिडीओ, खोट्या बातम्या यांचा व्हायरस पसरवत आहेत असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज NAM Summit मध्ये व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभाग घेतला होता. त्यामध्ये बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

सगळं जग कोरोनाचा सामना करतं आहे. मात्र त्याचवेळी फेक न्यूज, डॉक्टरेड व्हिडीओज आणि दहशतवादाचा भयानक व्हायरस पसरवत आहेत. यातून त्यांना समाज आणि देशांमध्ये तेढ निर्माण करायची आहे, असंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.

भारताच्या स्वतःच्या आरोग्यविषयक गरजा असताना आम्ही 123 देशांना मदत केली आहे. त्यातले 59 सदस्य देश हे Non Aligned Movement चे सदस्यही नाहीत, असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, सध्याच्या कोरोनाच्या संकट काळात भारताने लोकशाही, शिस्त आणि निर्णय क्षमता यांचा मिलाफ काय असतो ते दाखवून दिलं. त्यामुळे कोरोना विरोधातली लढाई ही सामान्य माणसाची चळवळ झाली आहे, असंही मोदी म्हणाले आहेत.

ट्रेंडिंग बातम्या-

भाजपने विधानपरिषदेची एक जागा ‘रिपाइं’ला सोडावी- रामदास आठवले

“मजूरांकडून रेल्वेभाडं घेणार नाही तर प्रत्येकी पाचशे रुपये मदत देणार”

महत्वाच्या बातम्या-

कर्नाटकात तळीरामांनी केला दारु खरेदीचा नवा विक्रम; दिवसभरात झाली ‘इतक्या’ कोटींची मद्यविक्री

प्रवीण गायकवाड यांना विधान परिषदेची उमेदवारी द्या; संभाजी ब्रिगेडची मागणी

“आपल्या विद्यमान पंतप्रधानांना कोणाचा सल्ला वगैरे काही लागत नाही”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More