Top News देश

परीक्षेला गेलेल्या मुलीचा प्रियकरासोबत सुरु होता भलताच अभ्यास, पोलिसांनी घेतला मोठा निर्णय

Picture Credit : Pixabay

नवी दिल्ली | बिहारमधील कटिहारयेथील 10वी च्या परीक्षेला गेलेली तरुणी पेपर सोडून आपल्या प्रियकराला भेटायला गेली होती. यादरम्यान त्या गावातील लोकांनी दोघांना एका बंद खोलीत विचित्र अवस्थेत बघितलं. संतापलेल्या गावकऱ्यांनी त्या गोष्टीची पोलिसांना माहिती देऊन दोघांनाही पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे.

त्या तरुणीला 5 वर्षांपुर्वी एका तरुणाचा चुकून फोन आला होता. त्या फोन नंतर दोघांमध्ये मैत्री होऊन काही दिवसानंतर प्रेमप्रकरणास सुरवात झाली. त्यांच्या प्रकरणाला 5 वर्ष पुर्ण झाली असून ते दोघे सतत भेटत होते. तरुणी 10वी च्या परिक्षेसाठी मनीहारला गेली होती, त्यादरम्यान हे प्रकरण सर्वांसमोर आलं आहे.

पोलिसांनी दोघांच्या कुटुंबीयांना बोलावून घेतले आणि त्यांच्या संमतीने त्या दोघांचं शेजारच्या मंदिरात लग्न लावून दिलं. त्यानंतर दोघांनीही पोलिस ठाण्यात जाऊन पोलिसांचा आर्शिवाद घेतला. मात्र, त्यानंतर प्रेमी युगलाच्या घरच्यांनी घरात घेण्यास नकार दिला असून सध्या दोघेही बेघर झाले आहेत.

दरम्यान, प्रियकराला भेटायच्या नादात तरुणीने 10वी चा पेपर दिला नसून तिचं वर्ष वाया गेलं आहे. मात्र या प्रकरणावर प्रतिक्रीया देत तरुणीने म्हटलं की “पेपर कधीही देता येईल मात्र प्रेम यशस्वी झालं हे म्हत्वाचं आहे”. आई-वडील घरुन लग्नाला तयार होते, मात्र तरुणीचे घरातले तयार नसल्यामुळे मंदिरात लग्न लावून दिलं. मात्र आता कुठं जायचं असा प्रश्न त्यांना पडला आहे, असं तरुणाने सांगितलं.

थोडक्यात बातम्या –

मशिदीत माईक बंद करायला विसरला मौलवी, ‘त्या’ आवाजानं गाव रात्रभर त्रस्त! पहा व्हिडीओ

15 कोटी म्हणजे किती रे भाऊ?, स्वतःवर लागलेली बोलू ऐकून त्याला पडला प्रश्न!

चंद्रकांत पाटलांच्या ‘त्या’ अजब वक्तव्याचा नवाब मलिकांकडून समाचार, म्हणाले…

पूजा राठोड प्रकरणात आणखी एक धक्कादायक माहिती, चुलत भावाला वनखात्यात चिटकवलं?

‘या’ भाजप नेत्याची एसआयटी चौकशी करा; सुप्रिया सुळे यांची मागणी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या