बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

इवेन्ट ख़त्म! 17 सप्टेंबरच्या लसीकरणावरून राहुल गांधींचा मोदी सरकारला टोला

नवी दिल्ली | देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनी विक्रमी लसीकरण करण्यात आलं. मात्र, त्यानंतर आता लसीकरण कमी झालेलं दिसत आहे. त्यावरून या लसीकरणाची 10 दिवस अगोदरच तयारी केली असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातोय. त्यावर आता काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी ट्विट करत मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसादिवशी 2.61 कोटी लोकांना लस देण्यात आली. त्यानंतर काल 18 तारखेला 85 लाख डोस देण्यात आले आहेत. त्यावर राहुल गांधी ट्विट करत सरकारला चिमटा काढला आहे. ‘इवेन्ट ख़त्म’, असं म्हणत त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. त्याचबरोबर त्यांनी #vaccination असा हॅशटॅग देखील वापरला आहे.

राहुल गांधी यांनी ट्विट करत एक आलेख शेअर केला आहे. या आलेखामध्ये 9 सप्टेंबर ते 18 सप्टेंबर दरम्यानचं लसीकरण दाखवलंय. यावरून दिसतंय की, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी लसीकरणात अचानक वाढ झाली. नरेंद्र मोदींच्या जन्मदिनी झालेलं लसीकरण नियोजन बद्ध होतं, असा अप्रत्यक्ष निशाणा राहुल गांधीनी केंद्र सरकारवर साधला आहे. तसेच अशाच लसीकरणाची देशाला गरज असल्याचं देखील राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, यापुर्वीही राहुल गांधी यांनी लसीरणाच्या धोरणावरून अनेकवेळा केंद्र सरकारवर टीका केली. त्यावरून लस घेतल्यानंतर ताप येतो त्याप्रमाणे देशातल्या काही राजकीय पक्षांना ताप आला आहे, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अप्रत्यक्षरित्या काँग्रेसवर निशाणा साधला होता.

पाहा ट्विट-

 

थोडक्यात बातम्या-

पंजाबच्या राजकारणात मोठा ट्विस्ट; चरणजीत सिंह चन्नी नवे मुख्यमंत्री

…अन् जयंत पाटलांनी पुर्ण केली ‘त्या’ 6 वर्षाच्या चिमुकल्याची इच्छा

शब्दालय प्रकाशनच्या ‘पुस्तकवारी’ पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन

‘आमची सत्ता आली तर…’; अरविंद केजरीवाल यांची मोठी घोषणा

सुखजिंदर सिंग रंधावा पंजाबचे नवे मुख्यमंत्री?; थोड्याच वेळात घोषणा होण्याची शक्यता

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More