मुंबई | ओबीसींची एकही जागा दुसऱ्या समाजाला देणार नाही, त्या जागी ओबीसी उमेदवारांचीच भरती केली जाईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्यावतीने आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
राज्य सरकारी नोकरीत ओबीसी समाजाला किती प्रतिनिधित्व मिळाले याचा आढावा घेतला जाईल. ओबीसी समाजाच्या रिक्त जागा असतील तर त्या जागा कालबद्ध पद्धतीने भरल्या जातील, असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, ओबीसी समाजाच्या विकासासाठी सरकार कटीबद्ध आहे, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.
महत्त्वाच्या बातम्या–
-मराठा आरक्षणासाठी आत्महत्येसारखी टोकाची पाऊलं उचलू नका!
-मराठ्यांनो गाडायचं असेल तर गद्दारांना गाडा, पण आत्महत्या करू नका!
-अबब!!! चक्क 25 लाखांचे केस चोरीला
-योगींचे पोलिस पैसे घेऊन कोणाचाही एन्काऊंटर करू शकतात!
-“उद्धव ठाकरेंना कायद्याबद्दल ज्ञान नाही, असं त्यांचेच खासदार मान्य करतात”