बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

”दरेकर काही चुकीचं बोलले नाहीत, पुणे पोलिसांनी बावळटपणा केलाय”

मुंबई | विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकरांनी पुण्यातील एका कार्यक्रमात बोलताना राष्ट्रवादी पक्षावर बोचऱ्या शब्दात टीका केली होती. त्यानंतर दरेकरांनी केलेल्या वक्तव्यावरुन राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकरांनी आक्रमक भूमिका घेत दरेकरांविरुद्ध एफआयआर दाखल केली. यावरुन आता भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे.

दरेकर काही चुकीचं बोलेले नसून हा पोलिसांचा बावळटपणा असल्याचं वक्तव्य चित्रा वाघ यांनी केलं आहे. याबाबत बोलताना पुणे पोलिसांनी दरेकरांचं भाषण न ऐकता त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला, त्यामुळे ओढूनताणून आणलेला हा निव्वळ बावळटपणा असल्याचं चित्रा वाघ यांनी म्हटलंय.

दरेकरांनी त्यांच्या भाषणात कुठेही बाई चा ‘ब’ देखील उच्चारला नाही. तसेच सुरेखा पुणेकरांचा देखील उल्लेख केला नाही. एवढंच नाही तर रंगलेला गुलाबी गाल बाईचाच का वाटतो? आणि पुणेकरांची मराठी चांगली असून देखील त्यांनी वाक्याचा अनर्थ का काढावा?, असा प्रश्न चित्रा वाघ यांनी विचारला आहे.

दरम्यान, कार्यक्रमात बोलताना राष्ट्रवादी हा रंगलेल्या गालाचा मुका घेणारा पक्ष असल्याचं वक्तव्य दरेकरांंनी केलं होतं. यावेळी त्यांनी सुरेखा पुणेकरांचा राष्ट्रवादीत केलेल्या प्रवेशाचा अप्रत्यक्ष संदर्भ दिला होता. यावरुन रुपाली चाकणकरांनी दरेकरांनी महिलांची माफी मागावी अशी आक्रमक भूमिका घेत पुण्यातील सिंहगड पोलीस ठाण्यात दरेकरांविरुद्ध तक्रार नोंदवली आहे.

थोडक्यात बातम्या-

दिल्ली ते अमेरिका, कित्येक तासांचा प्रवास, मोदींचं ‘वर्क फ्रॉम प्लेन’ पाहिलं का?

‘कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना मिळणार इतके हजार रुपये’; केंद्राचं सर्वोच्च न्यायालात उत्तर

“महाराष्ट्राला चूड लावाल तर तुमची धोतरेही पेटतील हे विसरू नका”

नरेंद्र मोदी 3 दिवस अमेरिकेच्या दौऱ्यावर; मोदींंचं अमेरिकेत जंगी स्वागत

मला कोरोना झाल्यानंतर किती लोकांनी देव पाण्यात ठेवले माहित नाही, पण… – उदयनराजे भोसले

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More