बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शरद पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावर प्रविण दरेकरांनी दिला पार्थ पवारांचा दाखला

मुंबई | उत्तर प्रदेशमधील लखीमपूरमध्ये झालेल्या शेतकऱ्यांच्या मृत्यूंच्या घटनेची तुलना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी जालियनवाला बाग हत्याकांडाशी केली होती. त्यानंतर भाजपकडून मावळ गोळीबाराची आठवण शरद पवारांना करून दिली आहे. पवारांच्या वक्तव्यानंतर आता राजकारण तापताना पहायला मिळत आहे. मावळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराला तब्बल 90 हजारांचे मताधिक्य मिळालं, असं शरद पवार म्हणाले होते.

शरद पवारांच्या वक्तव्यावर विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर उत्तर दिलंय. लोकसभा निवडणुकीत शरद पवारांचे नातू पार्थ पवार पिछाडीवर होते. तसेच मावळमध्ये भाजपला किती जनाधार हे पुन्हा एकदा बघा, असं टीका दरेकरांनी शरद पवारांना केली आहे.

केंद्रीय तपास यंत्रणांवर टीका करणं योग्य नाही. ज्या काही कारवाया सुरू आहेत, त्या सर्व न्यायालयाच्या चौकटीत राहूनच सुरू आहेत. केंद्रीय यंत्रणा चांगला तपास करत असतील तर त्यांची पाठ थोपटायला हवी. पण शरद पवार यांनी यंत्रणांना बळ मिळण्याऐवजी ड्रग्स तस्करांना बळ देत आहेत, असं दरेकर म्हणाले आहेत.

दरम्यान, शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेवर भाष्य केलं आहे. महाराष्ट्रातील शेतकरी फडणवीस यांच्या काळात झालेली मदत अजूनही विसरलेला नाही. विरोधी पक्षनेते असूनही त्यांच्यावर राज्यातील जनतेचा विश्वास आहे, असं दरेकरांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या –

“शरद पवारांचा न्यायालयावर विश्वास आहे की नाही?”

“सात दिवस झालं टोटल सुरु मात्र हिशोब लागत नाहीये”

‘त्या रात्री आर्यन क्रुझवर उपस्थित नव्हताच’; आर्यनच्या वकिलांचा खळबळजनक दावा

“जिल्ह्याची संस्कृती बिघडवू नका”, त्या’ प्रकरणावरुन पंकजा मुंडेंचा थेट निशाणा

सोनं-चांदी खरेदी करण्याआधी इथे तपासा लेटेस्ट भाव एका क्लिकवर

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More