बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सचिन वाझेच्या अडचणीत आणखी वाढ; NIA पथकाला नदीपात्रात आढळले महत्वाचे पुरावे

मुंबई | मनसुख हिरेन हत्याप्रकरणात आता एनआयएच्या हाती नवीन पुरावे लागल्याने एकच खळबळ माजली आहे. मनसुख हत्या प्रकरणामध्ये आणि प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकं ठेवल्याप्रकरणी पोलीस अधिकारी सचिन वाझेला राष्ट्रीय तपास यंत्रणेने अटक केली. त्यानंतर या प्रकरणात सचिन वाझेचा थेट संबंध असल्याचे बरेचसे पुरावे तपास यंत्रणेच्या हाती लागले.

सचिन वाझे याच्या अडचणीत आता वाढ होताना पाहायला मिळत आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेचं पथक आज संध्याकाळी बीकेसी परिसरातील मिठी नदी पात्रात तपासासाठी आलं असताना त्यांच्या हाती मोठे पुरावे लागल्याचं दिसून आलं.

मिठी नदीपात्रात उतरून सर्च ऑपरेशन सुरू असताना काही सीपीयू, नंबर प्लेट आणि डीव्हीआरचे काही पार्ट या नदीपात्रात सापडल्याने आता या प्रकरणात आणखी मोठा खुलासा होण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेनेचं पथक सचिन वाझेला वांद्रे परिसरातील खाडीजवळ तपासासाठी घेऊन गेलं आणि यावेळी शोध मोहीम सुरू असताना या धक्कादायक गोष्टी आढळून आल्या आहेत.

मिठी नदीमध्ये आढळून आलेल्या डीव्हीआरमध्ये कदाचित वाझे वास्तव्यास असलेल्या घराजवळील साकेत कॉम्प्लेक्स तसेच इतर ठिकाणचा सीसीटीवी फुटेज असेल त्यामुळे तो इथे नष्ट केला असण्याची दाट शक्यता एनआयएकडून व्यक्त केली जात आहे. एवढ्या मोठा प्रमाणात पुरावे आढळून आल्याने आता सचिन वाझेच्या अडचणीत मोठी वाढ होणार असल्याचं दिसून येत आहे.

थोडक्यात बातम्या – 

मोठी बातमी!!! महाराष्ट्रात पुन्हा लाॅकडाऊन?; मुख्यमंत्र्यांचे तयारीला लागण्याचे आदेश

रिषभ पंतच्या ‘त्या’ शॉटचा सातासमुद्रापार जलवा, न्यूझीलंडच्या बॅटसमनने मारला रिव्हर्स स्कूप, पाहा व्हिडीओ

गब्बर आणि हिटमॅन दोघंही सुपरहिट; केला ‘हा’ मोठा कारनामा

“उद्धव ठाकरेंना कणा नाही, आता नवीन सरकार यावं”

शरद पवार-अमित शहा भेट खरोखर झाली का?; अमित शहांचं सर्वात मोठं वक्तव्य

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More