बटण कोणतंही दाबा, मत कमळालाच; 77 ईव्हीएम बदललल्या!

कानपूर | बटन कोणतंही दाबा, मत कमळालाच पडतं, असा आरोप करत कानपूरमध्ये मतदारांनी जोरदार हंगामा केला. त्यानंतर तब्बल 77 ईव्हीएम बदलण्यात आल्याचं कळतंय. 

स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी आज उत्तर प्रदेशमध्ये मतदान होतंय. कोतवाली भागातील मनिराम बगिया येथील बंबईया हाता पोलिंग बूथवर मतदारांनी ईव्हीएममध्ये घोळ असल्याचं सांगत गोंधळ घातला. जाजमाऊच्या सेंट जोसेफ स्कूलमध्येही हाच प्रकार घडला. 

दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाने मात्र असा प्रकार झालाच नसल्याचं म्हटलंय. काही जणांकडून जाणूनबुजून असे प्रकार करण्यात येत असल्याचं निवडणूक आयोगानं सांगितलं.