बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“ईव्हीएमला विरोध करणारे नेते भ्रमिष्ट झालेत”

मुंबई | ईव्हीएमवर शंका घेणं म्हणजे भ्रमिष्टपणाचं लक्षण आहे. अशा तिखट शब्दात जससंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी विरोधकांवर टीका केली आहे. पत्रकारांशी बोलताना त्यांनी विरोधकांचा चांगलाचं समाचार घेतला आहे.

ईव्हीएमला विरोध करणारे नेते भ्रमिष्ट झालेले दिसतात. त्यांना जनतेचा कौल आहे जनमानस आहे याचा अंदाज येत नाही, असंही सावंत म्हणाले.

ईव्हीएमला विरोध दर्शवणं म्हणजे लोकसभा निवडणुकीत जनतेने जो कौल दिलेला आहे त्याचा अपमान करण्यासारखं आहे, असंही सावंतांनी सांगितलं आहे.

दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीत ज्यांना भुईसपाट होण्याची भिती वाटते असे लोक पक्षांतर करतात. येत्या निवडणुकीत युतीचं सरकार पुन्हा बहुमताने निवडून येईल, असा विश्वास सावंत यांनी व्यक्त केला आहे.

महत्वाच्या बातम्या-

-विराट कोहलीने पहिल्या T-20मध्ये केला ‘हा’ मोठा विश्वविक्रम

-…तर मी विधानसभा निवडणूक नक्की लढेल- अशोक चव्हाण

-उन्नाव बलात्कार प्रकरणातील आरोपी सेंगरच्या घरावर सीबीआयचा छापा

-राष्ट्रवादीत इनकमिंग; भाजपच्या ‘या’ नेत्या करणार राष्ट्रवादीत प्रवेश!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More