बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सुष्मिताबाबत एक्स बाँयफ्रेंड विक्रम भट्ट यांचा मोठा खुलासा, म्हणाले…

मुंबई | आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी ( Lalit Modi) यांनी एक पोस्ट केलीये. बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन आणि ललित मोदी एकमेकांना डेट करत आहेत. यावरून सुष्मिताचे यापूर्वीचे अफेअर हा एक चर्चेचा विषय बनला. काहींना तिला गोल्ड डिगर असंही संबोधलं आहे. या संपूर्ण प्रकरणावर सुष्मिताचा EX-बाँयफ्रेड विक्रम भट्ट याने आपल मत मांडलं आहे.

तो एका मुलाखतीदरम्यान म्हणाला सुष्मिता गोल्ड डिगर नाही तर लव डिगर आहे. सुष्मिता कधीच पैशाच्या मागे धावली नाही. माझ्यासोबत नात्यात असताना माझ्याकडे अजिबात पैसे नव्हते. आम्ही U.S ला गेल्यावर माझा सगळा खर्च सुष्मिताने केला होता. मी तीच्यामुळे पहिल्यांदा U.S ला जाऊ शकलो. तेथील लाॅस.एजेल या हाॅटेलवर गेल्यानंतर तेथे एक शानदार लिमोझिन(limousine) कार होती. मी ती बघून हैराण झालो होतो, असा किस्साही त्यांनी सांगितला.

हल्ली लोकांच्या आयुष्याची चेष्टा करणं म्हणजे मनोरंजन झालं आहे. तुम्ही जर कलाकार असाल तर तुमच्या छोट्या छोट्या गोष्टींनी तुम्हाला ट्रोल केलं जात. करिना कपूर खान हिने सैफशी लग्न केल्यावरही असंच करण्यात आलं होत. सुष्मिता मात्र सतत प्रेमाच्या शोधात असते, मी नेहमी तिझ्यासोबत असेन, असं म्हणत विक्रम भट्टने (Vikram Bhatt) सुष्मिताला पाठिंबा दर्शवला आहे.

दरम्यान, सुष्मिताला गोल्ड डिगर म्हणणाऱ्यांवर आज सुष्मितानही हल्लाबोल केला आहे. विक्रम भट्ट आणि सुष्मिता सेन हे दोघं दोन वर्षासाठी रिलेशनशिप मध्ये होते. 1996 मध्ये त्यांच ब्रेकअप (Breakup) झालं होतं.

थोडक्यात बातम्या

आर. माधवनच्या लेकाचा देशाला अभिमान; केली ‘ही’ कामगिरी

‘हा कॉमेडी एक्सप्रेस सिजन 2 आहे’; राऊतांनी शिंदे गटाची उडवली खिल्ली

उद्धव ठाकरेंकडून कारवाईचा सपाटा सुरूच, आणखी एका नेत्याची केली पक्षातून हकालपट्टी

आमदारांनंतर आता शिवसेनेच्या खासदारांनीही उद्धव ठाकरेंचं टेंशन वाढवलं; महत्त्वाची माहिती समोर

SBI च्या ग्राहकांसाठी गुड न्यूज; बँकेने घेतला महत्त्वाचा निर्णय

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More